Solapur, 11 September : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीमध्ये गंभीर जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोघे गंभीर जखमी आहेत. या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी वळसंग तंटामुक्त समितीचे अध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सद्दाम अमलीचुंगे असे हाणामारीत गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोहसीन वजीर तांबोळी, सलीम वजीर तांबोळी, हमीद जमादार सय्यद, अश्पाक सैपन माशाळकर आणि मौला वजीर तांबोळी यांना या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
वळसंगमधील आचेगाव रस्त्यावर मेहबूब मणुरे आणि सलीम तांबोळी यांच्यात वाद सुरू होता. तो वाद सद्दाम अमलीचुंगे याने मध्यस्थी करून मिटवला होता. त्याचा राग धरून बुडन गुड्डुभाई कटरे, मोहसीन तांबोळी व यासीन अब्बास कटरे यांनी सद्दामला ‘तूच भांडण लावतो, तूच मिटवतो, आम्ही तंटामुक्ती अध्यक्ष उगीच झालोय का? तू भांडण मिटविणे सोड, नाहीतर तुला खल्लास करून टाकीन,’ अशी धमकी दिली होती. त्यांना न जुमानता भांडण मिटवल्यानेच सद्दाम अमलीचुंगे याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
संशयित आरोपी हे चारचाकी आणि दुचाकींवरून आले होते. त्यांच्या हातात रॉड, पाइप, कोयते, काठ्या होत्या. त्यांनी फिर्यादीच्या घराकडे धाव घेतली आणि भाऊ तौसिफच्या पायावर लोखंडी पाइपने मारून त्याचा पाय मोडला. भांडण सोडविण्यासाठी बाहेर आलेल्या फिर्यादीला काठीने मारहाण केली, तर ईलाई माशाळकर यांच्या कानावर कोयत्याने वार करून जखमी केले. फिर्यादीचे काका कासिम यांना दगडाने मारले.
संशयितांनी सद्दामला आचेगाव रस्त्यावर ओढत नेले आणि लोखंडी रॉड व पाइपने बेदम मारहाण केली. ‘यहाँ पे रहने का है तो, हम बोलेंगे वैसाही करना पड़ेगा,’ असे म्हणत त्याला गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर संशयितांनी पुन्हा सद्दाम व त्याच्या भावाच्या घरावर दगडफेक केली.
अक्कलकोटच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एल. शेख यांच्यासमोर संशयित आरोपींना हजर करून पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक रविराज कांबळे तपास करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.