कऱ्हाड : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरु आहे. त्या स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या मल्लास महाराष्ट्र केसरी (कै) संजय पाटील आटकेकर यांच्या स्मरणार्थ एक लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र चॅम्पियन आणि (कै) संजय पाटील यांचे बंधू धनाजी पाटील यांनी केली.
अकोला येथे 1994 मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कराड तालुक्यातील आटके गावचे सुपूत्र (कै) संजय पाटील यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकून सातारा जिल्हय़ाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. यावर्षीची स्पर्धा सातारच्या मातीत होत आहे, याचा मनापासून आनंद होत आहे.
संजय पाटील यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांकडून जिल्ह्यातील मल्लांना नेहमीच प्रोत्साहन देत गोरगरीब मल्लांना मदत करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. लाल मातीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आणि संजय पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी महाराष्ट्र केसरी किताब पटकावणाऱ्या मल्लाला प्रोत्साहन देण्यासाठी एक लाख रूपयांचे बक्षिस देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.