Sunil Gadakh
Sunil Gadakh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विरोधकांकडे गडाखांना शिव्या देणे एवढेच भांडवल...

विनायक दरंदले

सोनई (जि. अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप वाढू लागले आहे. नेवासे तालुक्यात गडाख कुटुंबाचे वर्चस्व आहे. गडाखांवर भाजपचे ( BJP ) माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ( Balasaheb Murkute ) यांच्याकडून टीका होत आहे. या टिकेला जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांनी उत्तर दिले. Opponents have enough capital to speak badly about Gadakh ...

तामसवाडी (ता. नेवासे) येथे एक कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, तामसवाडीचे सरपंच चंद्रकांत जगताप, रमेश कोलते, काशीनाथ फोफसे, नंदकुमार कर्जुले, शंकरराव आयनर, राजेंद्र टेमक उपस्थित होते.

सुनील गडाख म्हणाले, "विकास कामांची कुठलीच दृष्टी समोर न ठेवता फक्त गडाखांना शिव्या देण्यात धन्यता मानली जात आहे. फक्त अमावस्या, पौर्णिमेलाच दिसणाऱ्या या नाटक कंपनीला सर्वांनी ओळखणे गरजेचे आहे", असे नाव न घेता सुनील गडाख यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर टीका केली.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये शंकरराव गडाखांना मानाचे स्थान दिले. हा विश्वास सार्थ होण्यासाठी तालुक्यात व जिल्ह्यात भगवा फडकण्यासाठी जीवाचे रान केले जाईल असे सांगून गडाख यांनी मंत्री गडाख यांनी पाचशे ते सहाशे कोटीची कामे तालुक्यात आणल्याने विरोधकांच्या तंबूत भुकंप झाला असल्याचे सांगितले.

विकासाचा मुद्दा नसल्याने गडाखांना शिव्या देणे हा एक कलमी कार्यक्रम माजी आमदार मुरकुटे करत आहेत. फक्त शिव्या देवून आमदार होण्याचे स्वप्न पाहू नये, असा टोला गडाखांनी मारला.

गटाला विकासाचे मॉडेल करणार

हिवरेबाजार व राळेगणसिध्दी आदर्शगाव म्हणून प्रसिद्ध आहेत याचप्रमाणे खरवंडी जिल्हा परिषद गटाला मॉडेल गट करुन देशात हा गट नावारुपाला आणण्यासाठी कामाला सुरवात केली असल्याचे गडाख यांनी भाषणात सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT