Ajit Pawar,MLA Gopichand Padalkar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar: '' लोकप्रतिनिधी झाला म्हणजे ...''; अजितदादांनी गोपीचंद पडळकरांना झापलं

Ajit Pawar On Gopichand Padalkar : '' अजित पवार कुणाला घाबरणारा माणूस नाही..''

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar Latest News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरज येथे शुक्रवारी मध्यरात्री केलेल्या पाडकामाविरोधावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.या कारवाईविरोधात मिरज येथे आज (दि.८)सर्वव्यापी बंदची हाक दिली आहे. मात्र, नेहमी अजित पवार आणि पवार कुटुंबावर टीका करणार्या आमदार पडळकरांविरोधात आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दंड थोपटले आहे.यावेळी अजितदादांनी पडळकरांना खडेबोल सुनावलं आहे.

अजित पवार हे कोल्हापूर दौर्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, गोपीचंद पडळकर याच्या भावानं सांगलीमध्ये काय केलं आहे याची माहिती घेणार आहे. पदावर असलो म्हणून नातेवाईकांनीही नीट वागलं पाहिजे. हे सध्याच्या काळात होत नाही. लोकप्रतिनिधी झाला म्हणजे शिंगं फुटली असं होत नाही अशा शब्दांत पडळकरांचा समाचार घेतला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका मुलाखतीत बोलताना म्हणाले, महाराष्ट्र राज्य सर्वार्थानं श्रीमंत असून एखादा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळं आपलं काहीही नुकसान होणार नाही. परंतू, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे असल्यानं त्यांनी केवळ गुजरातलाच प्राधान्य देणं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभत नसल्याची टीका ठाकरेंनी केली होती.

त्यावर बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरेंना खडेबोल सुनावलं आहे. पवार म्हणाले, राज्यातील एक जरी उद्योग बाहेर गेला तरी प्रचंड नुकसान होतं. त्यामुळे कोणत्याही राजकीय नेत्यांनी दोन-चार उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले म्हणून काय झालं असं वक्तव्य करू नये.

'' अजित पवार कुणाला घाबरणारा माणूस नाही..''

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. पाटील यांनी अजित पवार यांनी आधी स्वत: पालकमंत्री असताना पुण्यात काय कामं झालीत ती बघावीत आणि नंतर मला बोलावं. दुसऱ्याला टपली मारल्याशिवाय अजित पवारांचा विषय संपत नाही. त्यांना पेलावत नाही त्यामुळे पवार कुटुंबीय सारखा मला चिमटा काढत असते.

पण तुम्ही तर तेव्हा चार दिवस घरात लपून बसला होता, त्यामुळे दुसऱ्यावर दगड फेकताना आपण काचेच्या घरात बसलो आहोत याची जाणीव ठेवली पाहिजे. एकमेकांना आदर दिला पाहिजे असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला आहे. यावर अजित पवार कुणाला घाबरणारा माणूस नाही असं प्रत्युत्तर पवारांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT