Sachin Kalyanshetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sachin Kalyanshetti News : ''...त्याठिकाणी आमच्या भावना तीव्र असतील!''; भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टींचा कडक इशारा

Solapur BJP Political News : '' प्रत्येक ठिकाणी राजकारण कसं करता येतं....''

सरकारनामा ब्यूरो

Solapur : अक्कलकोटमध्ये औरंगजेबाचं स्टेट्स ठेवलं म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. त्यामुळे काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेत जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत आवाहन केलं. यावर आता अक्कलकोटचे विद्यमान आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.

सचिन कल्याणशेट्टी(Sachin Kalyanshetti) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या सिध्दराम म्हेत्रे यांचा चांगलाच समाचार घेतला. कल्याणशेट्टी म्हणाले, म्हेत्रे यांनी मूळची काँग्रेस संस्कृती जपायचं काम केलं आहे. प्रत्येक ठिकाणी राजकारण कसं करता येतं. प्रत्येक ठिकाणी जातं आणि धर्म शोधून काढून त्यावर बोट ठेवता येतं. हे काम काँग्रेसचे नेतेमंडळी करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं स्टेटस आणि चुकीची भाषा वापरली गेलीय. ती भाषा बाहेर आली तर त्याचे प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील. पण सिद्धराम म्हेत्रे(Siddharam Mhetre) आणि काँग्रेसची नेते मंडळी अशा व्यक्तीवर कारवाई करा म्हणून कोणीही पुढे आले नाहीत हे दुर्दैव असल्याचंही यावेळी ते म्हणाले.

दरम्यान, शिवजयंतीच्या दिवशी भगवा झेंडा जाळण्यात आला. तेंव्हाही अशांवर कारवाई करा म्हणून हे पुढे आले नाहीत. मी कोणाच्याही मारहाणीचं समर्थन करत नाही. पण छत्रपती शिवरायांबद्दल काढलेला अनुद्गार अक्कलकोटमधील युवकांना सहन न झाल्यामुळं त्यांच्या हातून हे घडलेलं आहे. पोलिसांनी कारवाई केली आहे आणि गुन्हा ही नोंद झालेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जिथं जिथं विषय येईल तिथं आमच्या भावना तीव्र असतील असा इशाराही कल्याणशेट्टी यांनी दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT