Sharad Pawar News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar News: 'तुतारी'मीच फुंकणार! 'या' मतदारसंघातून दररोज एक जण शरद पवारांच्या भेटीला

Pandharpur Mangalvedha Assembly Constituency 2024: अद्याप उमेदवार म्हणून कोणाचेही नाव निश्चित केले नाही त्यामुळे कोणताही उमेदवार जाहीर करा, पण लवकर करा असे सांगत दररोज नवीन नाव चर्चेत आहे.

हुकुम मुलाणी

Solapur Political News: विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटप झाले नसले तरी इच्छुकांनी निवडणुकीची तयारी केली आहे. उमेदवारी मिळण्यासाठी पक्षश्रेष्ठींना साकडे घातले जात आहे.

पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघातही अशीच परिस्थितीत आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. 'तुतारी' मिळवण्यासाठी इच्छुकांचे सध्या बारामती दौरे वाढले आहेत. मतदारसंघात 'तुतारी'कोण फुंकणार हा चर्चेचा विषय झाला आहे.

पंढरपूर विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या पाहता दररोज एक जण उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना भेटत आहे. अद्याप उमेदवार म्हणून कोणाचेही नाव निश्चित केले नाही त्यामुळे कोणताही उमेदवार जाहीर करा, पण लवकर करा असे सांगत दररोज नवीन नाव चर्चेत असल्याने सध्या पंढरपूरची उमेदवारी हा चेष्टेचा विषय झाल्याची कबुली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात अपेक्षित यश मिळाल्यामुळे सध्या आगामी विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला सत्ता येण्याचे संकेत नुकत्याच केलेल्या पाहणीत मिळाला आहे. सध्या महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी अनेक जण इच्छुक आहेत.

पंढरपुरातून तीच परिस्थिती आहे. 'तुतारी'चिन्हावर उमेदवारी मिळवण्यासाठी पंढरपुरातून सध्या भगीरथ भालके, अनिल सावंत, नागेश भोसले, सुभाष भोसले, वसंत देशमुख, राहुल शहा, चंद्रशेखर कोंडूभैरी, प्रथमेश पाटील, सिद्धेश्वर अवताडे, डॉ. संजयकुमार भोसले यासह 12 पेक्षा अधिक उमेदवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत उमेदवारी मिळावी व या मतदारसंघातून आपण किती सक्षम उमेदवार हे देखील सांगून उमेदवारीसाठी साकडे घातले.

सर्व इच्छुकांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कामाला लागा तर मतदारसंघातील मतदारांचा कानोसा घेऊन पुन्हा भेटा अशा सूचना दिल्या आहेत. त्यानंतरही सातत्याने इच्छुकांचे बारामती दौरे वाढले आहेत. इच्छुकांमधून पवार नेमके कुणाला संधी देणार याविषयी तर्कवितर्क सुरू आहे.

असे असतानाच बुधवारी भैरवनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत, वसंत देशमुख, नागेश भोसले, मंगळवेढ्यातून इच्छुक शहराध्यक्ष चंद्रशेखर कोडूभैरी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील,कार्याध्यक्ष संतोष रंदवे, माणिक गुंगे, आदींनी भेट घेत मतदार संघातील राजकीय कानोसा सांगितला.

पंढरपूर मंगळवेढाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीकडे असल्यामुळे यातून आपल्या मागे एक गट आहे हे दाखवण्यासाठी सध्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देखील बारामती भेट घडवून आणली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT