Bhagirath Bhalke-Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Lok Sabha 2024 : पंढरपूर-मंगळवेढ्यातील बड्या नेत्याचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा जाहीर

Vijaykumar Dudhale

Solapur, 18 April : सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांना भारत राष्ट्र समितीचे पंढरपूरचे नेते भगीरथ भालके यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या चर्चेवर पडदा पडला आहे. भालके हे आपल्या कार्यकर्त्यांसह प्रणिती शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोलापुरात दाखल झाले आहेत.

पंढरपूरचे आमदार (स्व.) भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भालके यांच्या पाठिंब्यामुळे शिंदे यांना मंगळवेढा (Mangalvedha) आणि पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील फायदा होण्याची शक्यता आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांनी एक लाखाहून अधिक मते घेतली होती. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्यात भालके यांची ताकद आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, भालके यांनी पाठिंबा जाहीर केला असला तरी मागील निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या अनुभवाबाबत त्यांच्या समर्थकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आम्ही 2014 मध्ये काँग्रेसचे काम करून लोकसभेला सुशीलकुमार शिंदे यांना लीड दिला. त्यानंतर विधानसभेची भारत भालके यांनी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी घेऊनही पक्षाचे पंढरपूर शहर आणि मंगळवेढा तालुक्यातील काही पदाधिकारी गळ्यात कमळाचा दुपट्टा घालून आमच्या विरोधात फिरले. आम्हाला पाडण्यासाठी धडपडले, असा आरोप केला होता.

तसेच, 2019 मध्ये मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी असूनही काँग्रेसकडून पुन्हा धोका झाला होता. काँग्रेसने आमच्या विरोधात एबी फॉर्म देऊन उमेदवार उभा केला होता. ती चूक आता करू नये, असे आवाहनही भालके समर्थकांनी केले होते. त्यामुळे भगीरथ भालके काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

समर्थकांच्या आक्रमक पवित्र्यानंतरही भगीरथ भालके यांनी संयमी भूमिका घेत भविष्यातील राजकारणासाठी आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार त्यांनी आज शिंदे यांच्या पाठिंब्याची घोषणा केली आहे. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भगीरथ भालके हे काही दिवस राजकीय अज्ञातवासात होते. पण, विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भालके हे राजकारणात पुन्हा ॲक्टिव्ह झाले. आता त्यांनी पंढरपूरमधून विधानसभेची निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे बीआरएसमध्ये गेलेले भालके हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार, हेही पाहावे लागणार आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT