Pandharpur Corridor : ‘पंढरपूर कॉरिडॉर होत असताना स्थानिकांनी वातावरण दूषित करणारे विषय काढू नयेत’

Sudhir Mungantiwar News : पंढरपूरचा विकास आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात येत आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News : पंढरपूरचा काशी विश्वनाथच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही पंढरपूरच्या काॅरिडाॅरसंदर्भात आग्रही आहेत. त्यावर सध्या काम सुरू आहे. पंढरपूरचा विकास होत असताना स्थानिकांनी वातावरण दूषित होणारे विषय आणू नयेत, अशी अपेक्षा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. (State government positive about Pandharpur Corridor : Sudhir Mungantiwar)

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विठ्ठल दर्शनासाठी शनिवारी (ता.3 फेब्रुवारी) पंढरपुरात आले होते. विठ्ठल दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पंढरपूर काॅरिडाॅरबाबत भाष्य केले. पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेला काॅरिडाॅरचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Pandharpur Corridor)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar : सहा वेळा विधानसभा जिंकणारे सुधीर मुनगंटीवार लोकसभेला दोनदा हरलेत...

विठ्ठल दर्शनासाठी आषाढी-कार्तिकीसाठी लाखो, तर दररोज हजारो वारकरी पंढरपुरात येत असतात. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन सुलभपणे मिळावे. मंदिर परिसरातील गर्दी कमी व्हावी, यासाठी पंढरपूर कॉरिडॉर राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काॅरिडाॅर सर्वेक्षणासाठी टेंडरही काढण्यात आले आहे. मात्र, पंढरपूर कॉरिडॉरला मंदिर परिसरातील काही व्यापारी आणि नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे पंढरपूर कॉरिडॉरची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून थंडावली आहे. मात्र, मुनगंटीवार यांच्या वक्तव्यामुळे हा कॉरिडॉर लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

पंढरपूरचा विकास आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात येत आहे. स्थानिक दुकानदारांचे काही प्रश्न आहेत. कॅबिनेट बैठकीत त्यासंदर्भात चर्चा झाली आहे. संवाद साधून तो प्रश्न मार्गी लावण्याचे ठरले आहे, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

Sudhir Mungantiwar
Bacchu Kadu Warning To BJP : बच्चू कडूंचा भाजपला कडक इशारा; ‘आधी विधानसभेचं बोला; मगच लोकसभेसाठी आमच्याकडे या’

गावात विकास कामे होत असताना कोणीही नाराज असू नये. त्यासाठी सर्वसमावेश तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारकडून होणार आहे. काशी विश्वनाथच्या धर्तीवर पंढरपूर विकास आराखडा बनविण्यात येणार आहे. आता फक्त स्थानिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. विनाकारण वातावरण दूषित होणारे विषय स्थानिकांनी आता काढू नयेत, अशी अपेक्षाही मंत्री मनुगंटीवार यांनी व्यक्त केली.

Edited By : Vijay Dudhale

Sudhir Mungantiwar
Mangalvedha Water Issue : ‘फडणवीसांचा शब्द खरा करणार; आघाडी सरकारचे पाप धुण्याचे काम सध्या करतोय’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com