Madan Bhosale, Makrand Patil
Madan Bhosale, Makrand Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'किसन वीर' अडचणीत आणण्यात पाटील बंधूंचाच सहभाग...मदन भोसले

Umesh Bambare-Patil

सातारा : ''वाई तालुक्याचे आमदार मकरंद पाटील आणि त्यांचे बंधू जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील या दोघांनी किसन वीर सहकारी साखर कारखाना अडचणीत कसा येईल याबाबत वेळोवेळी प्रयत्न केले. कारखान्याला आर्थिक मदत मिळू नये, कारखान नीट चालू नये, ही भावना ठेऊन ही मंडळी काम करत आहेत, पण त्यांना त्यात यश मिळणार नाही,'' असा आरोप किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी केला आहे.

किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष मदन भोसले यांच्या पॅनेलच्याविरोधात राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या पॅनेलमध्ये लढत होत आहे. दोन्ही बाजूंकडून सभासदांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल आमदार मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी मदन भोसले यांच्यावर आरोप केले होते. त्यांना आज मदन भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिउत्तर दिले आहे.

माजी आमदार मदन भोसले म्हणाले, ''वाई तालुक्याचे आमदार मकरंद पाटील आणि त्यांचे बंधू जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील या दोघांनी किसन वीर सहकारी साखर कारखाना अडचणीत कसा येईल याबाबत वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. त्यांना अनेकदा संधी मिळाली तिथं सहकारी संस्था त्यांना चालवता आलेली नाही, हे सर्व जनतेच्या समोर आहे.''

''चार वर्षापासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आम्हाला 'किसन वीर'साठी आर्थिक सहाय्य केले. परंतु, गेल्या दोन वर्षांमध्ये राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर प्रशासक मंडळाला हे करायला भाग पाडलं. आम्हाला पैसे देऊ दिले नाही हे सगळे उघड सांगताना आता अवघड होत आहे. कारण हे सगळं करायला भाग पाडण्यामध्ये या दोन पाटील बंधूंचा पुढाकार आहे, ही वस्तुस्थिती आहे.''

''मी सगळ्यांची नावे घेऊन त्यांना अडचणीत आणणार नाही. शेतकरी, सभासद परिसरातील नेते मंडळी आमच्यासोबत आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेला म्हणून तुम्हाला अडचणीत आणले जातंय की हे दोन बंधूंसह राष्ट्रवादीचे नेतेही यामागे आहेत, या प्रश्नावर मदन भोसले म्हणाले, '' मी कोणत्याही पक्षाचे नाव घेणार नाही. वाई तालुक्याचे आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष व त्यांचे निवडक सहकारी सातत्याने 'किसन वीर' परिवार अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारखान्याला आर्थिक मदत मिळू नये, कारखान नीट चालू नये, ही भावना ठेऊन ही मंडळी काम करत आहेत, पण त्यांना त्यात यश मिळणार नाही.''

''सहकाराचा गाभा लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या मालकीच्या संस्था ठेऊन त्या चालवणे हा गाभा आहे. संधी मिळाली तेथे त्यांना संस्था चांगल्या प्रकारे चालवता आलेल्या नाहीत. ''गेल्या चार वर्षात आम्हाला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सहकार्य केले. पण, दोन वर्षापूर्वी राजकिय परिस्थिती बदलल्यानंतर आम्हा आर्थिक मदत देऊ नये यासाठी काहींनी बँकेच्या प्रशासकिय मंडळाला भाग पडले. या गोष्टी मोकळेपणाने सांगणे योग्य नाही. पण, हे सगळे करण्यास भाग पाडले यामध्ये या दोन बंधूंचा पुढाकार आहे, ही वस्तुस्थिती आहे,'' असेही मदन भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT