Prithviraj Chavan: राज्यातील विधानसभा निवडणुकीत शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांची महाविकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला संविधान व राज्यघटना मोडू पाहणाऱ्या जातीयवादी भाजपमध्ये थेट लढत आहे.
त्यामुळे ही दोन व्यक्तींची नव्हे, तर दोन विचारांची लढत असल्याने कऱ्हाडमधून आता तिसऱ्यांदा जातीयवादी शक्तींना पराभूत करायचे आहे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येथील मंगळवार व बुधवार पेठ येथील पदयात्रेनंतर महात्मा फुलेनगर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार, माजी उपाध्यक्ष फारुख पटवेकर, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, डॉ. मधुकर माने, अक्षय सुर्वे, अॅड. राम होगले, सिद्धार्थ थोरवडे, शीतल वायदंडे, ज्ञानदेव राजापुरे, राहुल चव्हाण, झाकिर पठाण, जुबेर मोकाशी, ऋतुराज मोरे, शशिराज करपे, रमेश वायदंडे, हणमंत घाडगे, युवराज भोसले उपस्थित होते.
आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘राज्य सरकारने अनेक पातळ्यांवर भ्रष्टाचार चालवला आहे. मालवणमध्ये उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळला. या मंडळींनी छत्रपतींना सोडले नाही.
ते तुम्हा- आम्हाला काय सोडणार. स्पर्धा परीक्षांतही या सरकारमुळे गोंधळ झाला. या शहराने समता आणि बंधुता जपणाऱ्या विचारांची पाठराखण केली. विरोधकांकडे वाममार्गाने पैसा आला आहे.
ते या पैशाचा वापर मते विकत घेण्यासाठी करतील; परंतु कऱ्हाडची जनता त्यांच्या पैशाची दहशत मोडून काढेल, असा मला विश्वास आहे. त्यांना तुम्ही दोनदा बाहेरचा रस्ता दाखवला. आता तिसऱ्यांदा रस्ता दाखवण्यासाठी सज्ज राहा.’’
डॉ. माने म्हणाले, ‘‘राग आणि द्वेशामुळे सत्यानाश होतो. जातीयवादी लोक खोटा प्रचार करत आहेत. काँग्रेसने वंचितांचे हक्क टिकवून ठेवले. पृथ्वीराज चव्हाण यांना देश ओळखतो. त्यांच्या शब्दाला खूप मोठी किंमत आहे. त्यांना साथ देणे, ही जबाबदारी प्रत्येकाची आहे.’’
शिवाजीराव सन्मुख, बबनराव जाधव, राजेंद्र शेलार, शिवराज मोरे, अक्षय सुर्वे, प्रा. अमित माने, फारुक पटवेकर यांची भाषणे झाली. यावेळी अक्षय सुर्वे व रियाज नदाफ यांनी आमदार चव्हाण यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांचा आमदार चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ओंकार माने यांनी स्वागत केले. युवराज भोसले यांनी सूत्रसंचालन केले. रमेश वायदंडे यांनी आभार मानले.
झोपडपट्टी पुनर्वसनावरून दिशाभूल
वडगाव हवेलीच्या सभेत अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराशेजारील झोपडपट्टीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांना हे माहिती नाही, की २०१७ मध्येच १५२ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झाले. उर्वरित लोकांची सदनिका ताब्यात घेण्यासाठी लागणारा स्वनिधी भरण्याची अवस्था नसल्याने ती लोकं नवीन घरात गेलेली नाहीत. ते निव्वळ खोटे सांगत आहेत. पहिल्यांदा कऱ्हाड उत्तरेत उभे राहिले तेथे नापास झाले. त्यानंतर दक्षिणेतही नापास झाल्याचा टोला संतोष थोरवडे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.