Prithviraj Chavan: संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचा पृथ्‍वीराज चव्‍हाण यांना पाठिंबा

Prithviraj Chavan: देहूतील शिष्‍टमंडळाने कऱ्हाडात केला सन्‍मान
Karhad South Assembly
Karhad South AssemblySarkarnama
Published on
Updated on

Prithviraj Chavan : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व महाविकास आघाडी मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे.

श्री क्षेत्र देहू येथील तपोभूमीतील समितीचे संस्थापक तुकोबाभक्त मधुसूदन पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने आमदार चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांनी आमदार चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी सत्वशीला चव्हाण यांचा वारकरी शाल, तुळशीचा हार घालून सत्कार करत आपली भूमिका जाहीर केली.

Karhad South Assembly
Atul Bhosale: समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध

संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने आमदार चव्हाण यांना पाठिंब्याचे पत्र दिले. यामध्ये असे नमूद केले आहे, की आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना संतभूमीसाठी फार मोठे योगदान दिले आहे.

त्यामधील अत्यंत महत्त्वाचे कार्य म्हणजे श्री क्षेत्र देहूजवळील संत तुकोबारायांची ध्यान साधना तपोभूमी असलेल्‍या भंडारा भामचंद्र डोंगर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून २०११ मध्‍ये शासनाने घोषित केले. त्यासाठी शासनाच्या सांस्कृतिक, पुरातत्त्व विभागाद्वारे अधिसूचनाही जारी केली. त्यामुळे या संपूर्ण पवित्र क्षेत्राला आज सुरक्षितता प्रदान झाली आहे.

Karhad South Assembly
Atul Bhosale: कऱ्हाडमध्ये उद्योग आणता आला नाही

येथील वारकरी धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने न्याय्य अधिसूचनांचे कायदेशीर पालन होण्यासाठी त्वरित अध्यादेश काढावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा व संघर्ष केला; परंतु आपल्‍यानंतर कोणत्याच सरकारने संवेदनशीलपणे दखल घेतली नाही. त्यामुळे डाऊप्रमाणे वारकऱ्यांवर पुन्‍हा आंदोलनाची वेळ आली आहे.

आम्हा वारकऱ्यांस विश्वास वाटतो की, हे काम आपणच पूर्ण करू शकाल. त्यासाठी आपणास मुख्यमंत्री म्हणून पुन:श्च भाग्य लाभावे व हे ऐतिहासिक कार्य पार पाडावे, यासाठी राज्यातील तमाम जनता जनार्दन, वारकरी, फडकरी दिंडीच्या वतीने शुभेच्छांसह जाहीर पाठिंबा दिला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com