Ashutosh Kale: आमदार या नात्याने कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून जनतेचा विश्वास सार्थ ठरवला. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी औद्योगिक वसाहतीची उभारणी करण्यास आपण कटिबध्द आहोत.
सोनेवाडी व सावळीविहीर सिमेवरील ही नवी औद्योगिक वसाहत मतदारसंघाला वरदान ठरणार आहे. मागील निवडणुकीत दिलेली आश्वासने आपण पूर्ण केली आहेत. विकासाचा हा वेग असाच कायम ठेवण्यासाठी जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव शहर व परिसरात आयोजित कोपरा सभा व बैठकांच्या माध्यमातून मतदारांसोबत संवाद साधताना ते बोलत होते.
ते म्हणाले, की या औद्योगिक वसाहतीचे भूमिपूजन देखील झाले आहे. या माध्यमातून तरुणाईचे भवितव्य घडणार आहे. कोपरगाव शहरालगतची ४३३ एकर जमीन उपलब्ध होईल. तेथे आणखी एक औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत.
मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय येथील शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला यांनाही उद्योग व्यवसाय व नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. भविष्यात इतर विकसित शहराच्या बरोबरीत कोपरगाव शहराचा विकास केला जाईल.
गेल्या पाच वर्षांत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढला. विकासाचा आणि प्रगतीचा हा वेग असाच कायम ठेवण्यासाठी जनतेची खंबीर साथ मला मिळत आहे.
पाच क्रमांक साठवण तलावाचे काम पूर्ण करून शहराचा पाणीप्रश्न सोडवला. शहरासाठी १३२ कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा मंजूर करून आणली. या योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. कोपरगावकरांना दररोज मुबलक शुध्द पाणी लवकरच मिळू लागेल. त्यामुळे शहरवासीयांना मोठे समाधान मिळाले आहे. कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने देखील ही महत्त्वाची बाब ठरणार आहे.
- आमदार आशुतोष काळे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.