Makarand Patil: शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाई शहराचा सर्वांगीण विकास करणार आहे. पुढील तीन महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा वाई शहरात उभारणार असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.
वाई येथील गंगापुरीमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रताप पवार, तीर्थक्षेत्र आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, माजी नगराध्यक्ष संजय लोळे, श्रीकांत चव्हाण, भूषण गायकवाड, अजित वनारसे, चरण गायकवाड, विजय ढेकाणे, भारत खामकर, रूपाली वनारसे, शीतल शिंदे, पद्मा पिसाळ, संदीप डोंगरे, प्रदीप जायगुडे, प्रशांत नागपूरकर, मनीषा घैसास, यशवंत लेले, तेजस जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘मागील १५ वर्षांत मतदारसंघातील प्रत्येक घटक केंद्रबिंदू मानून कामे केली. महाबळेश्वर तालुक्यात दोन वर्षांत ४०० नवीन पूल बांधले. प्रतापगडच्या सुशोभीकरणासाठी १२१ कोटी मंजूर करून घेतले.
क्षेत्र महाबळेश्वरसाठी १८७ कोटी मंजूर केले. कोयनेच्या बॅक वॉटरला पहिला पूल २८ कोटी रुपयांमध्ये बांधून घेतला आणि आता १७५ कोटी रुपयांचा पूल सुरू आहे. महाबळेश्र्वर, वाईला अधिकाधिक पर्यटक कसे येतील याबद्दल योजना आखली आहे.’’
प्रताप पवार म्हणाले, ‘‘वाई, पाचगणी, महाबळेश्वरमधील पर्यटन वाढविण्यासाठी मकरंद पाटील प्रयत्न करत आहेत. विकास करण्याची दृष्टी असलेले मकरंद पाटील यांना महायुतीच्या सत्तेत कॅबिनेट मंत्री पाहण्याची सर्व जनतेची इच्छा आहे.’’
किसन वीरच्या कामगारांचा पाठिंबा
किसन वीर कारखान्याच्या सर्वच कामगारांनी मकरंद पाटील यांना एकमुखी पाठिंबा जाहीर करून सर्वाधिक मतांनी निवडून द्यायचा निर्धार केला आहे. कामगारांनी दिलेल्या पाठिंब्यानंतर मकरंद पाटील यांनी किसन वीरचे कामगार व शेतकऱ्यांनी केलेल्या विनंतीमुळे मी किसन वीर कारखाना ताब्यात घेत कामगार व शेतकऱ्यांसाठी माझी आमदारकी पणाला लावल्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.