Makarand Patil: वाईच्या वैभवासाठी १५० कोटींचा आराखडा

Makarand Patil: वाईतील प्रचारसभेत ग्‍वाही, रिंग रोडने जोडण्‍याचेही नियोजन
Wai Assembly
Wai AssemblySarkarnama
Published on
Updated on

Makarand Patil: वाईच्या वैभवात भर घालण्‍यासाठी १५० कोटींचा आराखडा तयार केला आहे. वाई शहराला रिंग रोडने जोडणार असल्याचे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी केले.

वाई- खंडाळा, महाबळेश्‍‍वर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्‍हणून रविवार पेठेतील प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी माजी नगरसेवक दादासाहेब पवार, बापूसाहेब जमदाडे, संदीप नायकवडी, पप्पू हगीर, संग्राम पवार, धनंजय हगीर, भारत खामकर, महेंद्र धनवे, पिंटू चक्के, माजी नगराध्यक्षा स्मिता नाईकवडी, शंकर ढगे, भारत चव्हाण, सचिन जमदाडे, समीर मुंगसे, प्रशांत हेरकळ, शंभू सूर्यवंशी, श्रीधर भाडळकर, गिरीश जगताप, प्रसाद बनकर, नीलेश मोरे, अतुल जमदाडे, अनिकेत वाईकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Wai Assembly
Makarand Patil: तुमचे योगदान एकदा जनतेला कळू द्याच !

आमदार पाटील म्हणाले, ‘‘४० वर्षांपूर्वी वाईच्या पाणीपुरवठ्याची योजना करण्यात आली; पण आता शहराचा विस्तार झाला आहे. म्हणूनच धोम धरणातून संपूर्ण वाई शहराला थेट पाणीपुरवठा करणारी ७० कोटी रुपयांची योजना मंजूर करून घेतल्‍याने संपूर्ण वाईचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

वाईतील जुन्या पुलाच्‍या जागी नवीन पूल बांधल्‍याने वाईच्‍या सौंदर्यात वाढ झाली. कृष्‍णेचे प्रदूषण रोखण्‍यासाठीच्‍या उपाययोजना राबविण्‍यात येत असून, त्‍यासाठीच्‍या प्रकल्‍पात होणाऱ्या प्रक्रियेनंतर ते पाणी शेतीसाठी वापरण्‍यात येणार आहे.

शाळांच्‍या इमारती, कृष्णा नदीवर आणखी एक समांतर पूल, नदीकाठावर संरक्षक भिंतीसह वाईच्‍या वैभवासाठी १५० कोटींचा आराखडा मंजूर करून घेतला आहे. राज्‍यातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तीन महिन्‍यांत उभारण्‍यात येणार असून, त्‍यासाठी एक कोटी सात लाखांचा निधी देखील तयार आहे.

यावेळी अनिल सावंत, विजय ढेकाणे, डॉ. नितीन कदम, नंदकुमार ढगे, मोजमभाई इनामदार, महेंद्र धनवे यांनी मनोगतात मकरंद पाटील यांना मताधिक्‍य देण्‍याचे आवाहन केले.

Wai Assembly
Makarand Patil: जनतेसाठी भव्‍य ट्रॉमा सेंटर उभारणार

मिळालेली पदे जनतेमुळेच

एकाच घरातील पदांच्‍या कारणावरून विरोधक ओरडत असल्‍याच्‍या मुद्द्यावर मकरंद पाटील म्‍हणाले, ही पदे ओरबाडून नाही, तर जनतेने दिली आहेत. पदाचा मान आणि सर्वांच्‍या विश्वासाला पात्र राहून आम्ही काम करत असल्‍याने मतदार आम्‍हाला निवडून देत असल्‍याचे सांगत, पुन्‍हा एकदा विक्रमी मतांनी निवडून देण्‍याचे आवाहनही त्‍यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com