Karhad North Assembly  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manoj Ghorpade: एकवेळ बदल घडवून कायापालट पाहूया...

Manoj Ghorpade: चित्रलेखा माने- कदम; रहिमतपूर येथे मनोज घोरपडे यांच्‍या प्रचाराचा प्रारंभ, मान्‍यवरांची उपस्‍थिती

सरकारनामा ब्यूरो

Manoj Ghorpade: गेल्या २५ वर्षांपासून कऱ्हाड उत्तरचा विकास रखडला आहे. त्यासाठी एकवेळ येथील लोकप्रतिनिधी बदला. महायुतीच्या माधमातून मतदारसंघाचा कायापालट झाल्‍याशिवाय राहणार नाही.

मतदारसंघातील कोरेगाव तालुक्यातील जी गावे पाण्यापासून वंचित आहेत, त्या गावांना जिहे- कटापूर योजनेतून लवकरच पाणी देण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु महायुतीने केलेल्या कामांचे श्रेय घेऊन विद्यमान आमदार दिशाभूल करत आहेत.

त्‍यामुळे आता मनोज घोरपडे यांना विजयी करून मतदारसंघाचा झालेला कायापालट पाहूया, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्‍या महाराष्‍ट्र प्रदेश महिला उपाध्‍यक्षा चित्रलेखा माने- कदम यांनी केले.

रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे प्रमुख मान्यवर व नागरिकांच्‍या हस्ते प्रचाराचा प्रारंभ झाला. त्‍या वेळी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष धैर्यशील कदम, संपतराव माने, वासुदेव माने, सचिन बेलागडे, रणजित माने, नीलेश माने आदी उपस्थित होते.

माने- कदम म्‍हणाल्‍या, ‘‘कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. हा मतदारसंघ विद्यमान आमदारांच्या एकेरी कारभाराला कंटाळला आहे. त्यामुळे (कै.) यशवंतराव चव्हाण यांचे सत्तेचे विकेंद्रीकरणाचे स्वप्न पूर्ण करण्याचा मुख्य हेतू या निवडणुकीमागचा आहे.

गेल्या पंचवीस वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या काळात सहकारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जनतेच्या भल्यासाठी कोणताही मोठा प्रकल्प किंवा शाश्वत विकास न करणाऱ्या निष्क्रिय आमदारांना बदलण्‍यासाठी रहिमतपूरकरांनी मोठ्या ताकदीने एकत्र यावे. यावेळी रहिमतपूर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नीलेश माने यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले.

नानासाहेब माने, जनार्दन चव्हाण, शंकर भोसले, धनंजय पवार, मुगुटराव माने, विकास माळी, राजेंद्र रोकडे, प्रवीण माने, अंकुश भोसले, तुषार चव्हाण, शेखर माने, सतीश लावंघरे, ॲड. अधिराज माने, के. टी. माने, सिद्धू माने, विशाल माने, पोपट वायदंडे, राजू सय्यद, सैफ डांगे, अनिकेत माने, पवार, कोपर्डेकर, तारखे, जयवंत माने, अच्युत माने, अशोक माने, राजू माने, लिंबाजी सावंत आदी उपस्थित होते.

बंडातात्‍यांना सुपूत्राच्या हट्टापोटी माफी मागायला लावली : पाटील

कऱ्हाड उत्तरच्या निष्क्रिय आमदारांच्या डोक्यात पालकमंत्री व सहकार मंत्री पदाची इतकी हवा गेली होती, की त्यांनी सुपूत्राच्या हट्टापोटी ज्येष्ठ वारकरी बंडातात्या कराडकर यांना माफी मागायला लावली.

काय चुकले होते बंडातात्याचे? व्यसनमुक्त युवक तयार झाला पाहिजे हे काय चुकीचे आहे का? आता वारकरी सांप्रदायच यांचा हिशोब करणार असून यांना घरी पाठवण्याची वेळ झाली असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.

पेरले (ता. कऱ्हाड) येथे भाजप महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी समाजभूषण जयसिंगराव चव्हाण, यशवंत चव्हाण, कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकरराव शेजवळ, रणजित कदम, रामराव भोसले, भूषण चव्हाण व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण म्हणाले, मनोज घोरपडे यांच्या माध्यमातून सक्षम उमेदवार कऱ्हाड उत्तरला मिळाला आहे. जयसिंगराव चव्हाण म्हणाले, पुढील दहा दिवस सर्वांनी काम करून मोठे मताधिक्य मनोज घोरपडे यांना देवूया. यावेळी शंकर शेजवळ यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT