Manoj Ghorpade: पाण्‍यापासून वंचित गावांना आम्‍हीच न्‍याय देऊ

Manoj Ghorpade: शामगाव येथील प्रचारार्थ कोपरा सभा, अंतवडी परिसरात रॅली
Karhad North Assembly
Karhad North AssemblySarkarnama
Published on
Updated on

Manoj Ghorpade: कऱ्हाड उत्तरमधील ४३ गावांना २५ वर्षांत आमदारांना पाणी देता आलं नाही. दुष्काळी भागाप्रमाणे अनेक गावे आजही पाण्यापासून वंचित आहेत. या गावांना पाणी देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

त्यामुळे भविष्यात आम्हीच पाणी प्रश्न सोडवू, अशी ग्‍वाही भाजप महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी दिली.

शामगाव (ता. कऱ्हाड) येथे प्रचारासाठी आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्‍ण वेताळ, शेतकरी संघटनेचे नेते सचिन नलवडे, बाळासाहेब पोळ, राहुल यादव, उद्धव पोळ, तात्यासाहेब पोळ, कृष्णात पोळ, डॉ. सचिन पोळ, सुरेश पोळ, सचिन डांगे, बापूराव पोळ, जगदीश लावंड, अक्षय मेनकुदळे, गणेश मम्हा‍णे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Karhad North Assembly
Manoj Ghorpade: चोरे विभागाचे पाण्याचे स्वप्न पूर्ण करणार

श्री. घोरपडे म्हणाले, ‘‘कोणतेही व्हिजन नसलेले नेतृत्व आपल्याला घरी घालवायचे आहे. आजवर शामगावच्या ग्रामस्थांनी पाण्यासाठी आंदोलन केले, त्या वेळी विद्यमान आमदारांनी हात वर करून तुम्हाला जे पाणी देतील, त्यांच्याकडून घ्या, असा सल्ला दिला होता; परंतु महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही पदावर नसताना या आंदोलनस्थळी भेट देऊन शामगावला पाणी आरक्षित करून घेतले.

आरक्षित झालेले पाणी शामगावच्या शिवारात खिळवायचे आहे. त्यासाठी महायुतीचा आमदार इथे झाला पाहिजे. अन्यथा, आरक्षित झालेले पाणी येण्यासाठी आणखी ३० वर्षे वाट बघावी लागेल.’’

गेली पस्तीस वर्षे आमदारकी ज्यांच्या घरात आहे, त्यांना शामगावचा पाणी प्रश्न सोडवता आला नाही. हणबरवाडी, धनगरवाडी योजनेचे स्‍वप्‍न (कै.) पी. डी. पाटील यांनी पाहिले; परंतु २५ वर्षे आमदारकी, त्यापैकी अडीच वर्षे मंत्री असूनही ज्यांना स्वत:च्या वडिलांचे स्वप्न त्यांना पूर्ण करता आलं नाही, ते कऱ्हाड उत्तरच्या जनतेचे स्वप्न काय पूर्ण करणार? जे आजपर्यंत आपल्याला पाणी देऊ शकले नाहीत, त्यांना आता २० तारखेला मतदानातून पाणी दाखवा, असे आवाहन रामकृष्ण वेताळ यांनी केले.

सचिन नलवडे म्हणाले, ‘‘मनोज घोरपडे हे कऱ्हाड उत्तरसाठी सक्षम चेहरा आहे. महायुतीच्या सरकारने कऱ्हाड उत्तरमध्ये भरपूर निधी उपलब्ध केला आहे. गेल्या अडीच वर्षांत देशाच्या, राज्याच्या विकासासाठी महायुतीची महत्त्वपूर्ण कामे झाली आहेत.’’

डॉ. सचिन पोळ म्हणाले, ‘‘शामगावचा पाणीप्रश्न सुटला, तर येथील बेरोजगार युवा वर्ग शेतकरी उद्योजक होईल. महायुतीच शामगावचा पाणी प्रश्न सोडवू शकते, हे ओळखून शामगावातून मनोज घोरपडेंना ८० टक्के मतदान देणार असल्याचा निर्धार करू.’’

Karhad North Assembly
Prithviraj Chavan: व्यक्तिगत नव्‍हे सार्वजनिक विकासावर भर

अंतवडी परिसरात रॅली

या विभागातील अंतवडी, रिसवडसह पाचुंद, कामथी, सुर्ली, मेरवेवाडी, करवडी, शामगाव, वाघेरी, शहापूर, वडोली निळेश्वर, शहापूरसह अन्य गावांमध्ये काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थांनी प्रचार रॅलीत सहभागी होत मनोज घोरपडे यांना पाठिंबा दर्शविला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com