Subhash Deshmukh: दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावासाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. तालुक्यातील प्रत्येक गाव समृद्ध गाव करायचे आहे. त्यासाठी पुन्हा साथ देऊन महायुतीला सत्तेत आणा. तालुका सुजलाम् - सुफलाम् होईल, अशी ग्वाही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार देशमुख यांनी यत्नाळ, फताटेवाडी, शिरवळ, बोरूळ, बंकलगी, आहेरवाडी, सिंदखेड, मद्रे, घोडातांडा या गावांना भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत झाले. ते म्हणाले, तालुक्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी ११३७ कोटींचा निधी दिला. शिवाय मुख्यमंत्री ग्रामसडक, मूलभूत सुविधा, ग्रामीण रस्ते, ग्रामपंचायत बांधकामासाठी २२७ कोटी, वडापूर बॅरेजसाठी ६७ कोटी, होटगी आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृह बांधकामासाठी ३२ कोटींचा निधी दिला आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावाला निधी दिला आहे. आणखी कामे करण्यासाठी मला पुन्हा संधी द्यावी. तालुक्याचा कायापालट कायापालट करू.
महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह विविध योजना सुरू केल्याबद्दल महिलांसह शेतकऱ्यांनी आमदार देशमुख यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.
यावेळी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, हणमंत कुलकर्णी, माजी तालुकाध्यक्ष रामपा चिवडशेट्टी, नामदेव पवार, अंबिका पाटील, अतुल गायकवाड, सरपंच जगन्नाथ गायकवाड, मल्लिकार्जुन चिवडशेट्टी, सरपंच सुनंदा वाघमोडे, उपसरपंच सुनील हिरापुरे, बाबय्या स्वामी, रमेश तोरूनगी, गणेश तळेकर, राजशेखर हिरापुरे, मल्लिकार्जुन कोनदे, केदार हिरापुरे, पाचलिंग अंबलगी, श्रीशैल कोरे उपस्थित होते.
धुबधुबी तलावात पाणी, साठवण क्षमताही वाढवली
नुकतेच धुबधुबी तलावामध्ये उजनी धरणाचे पाणी पोहोचले आहे. आमदार देशमुख यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. ऐन गरजेवेळी पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार देशमुख म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांची पाण्याची अडचण लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला.
त्यामुळे तातडीने उजनी धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. यापूर्वी तलावातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवली. यापुढेही शेतकऱ्यांच्या हाकेला तत्पर धावून येणारे सरकार आपल्याला आणायचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.