Subhash Deshmukh: शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महायुतीला विजयी करा

Subhash Deshmukh: आमदार सुभाष देशमुख यांचे आवाहन; ठिकठिकाणी मतदारांशी संवाद
Solapur South Assembly
Solapur South AssemblySarkarnama
Published on
Updated on

Subhash Deshmukh: महाआघाडी सरकारने अडीच वर्षांत विकासाच्या अनेक योजना बंद केल्या. महायुती सरकारने त्या पुन्हा सुरू केल्या. शिवाय शेतकऱ्यांसह सर्व घटकांच्या हिताच्या आणखी कल्याणकारी योजनाही सुरू केल्या.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणा, असे आवाहन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

Solapur South Assembly
Paschim Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्राचा ‘दादा’ कोण?

आमदार देशमुख यांनी डोणगाव तांडा, डोनगाव, नंदूर, तेलगाव, पाथरी, नांदणी, टाकळी, बरूर, सांजवाड, बोळकवठे, राजूर, होनमुर्गी येथील मतदारांशी संवाद साधला. ते म्हणाले, तालुक्याच्या विकासासाठी शेती, पर्यटन, रस्ते विकास यांना चालना दिली.

प्रत्येक गावाला निधी देत अंतर्गत काँक्रिट रस्ते, पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटारी केल्या. चांगल्या रस्त्यांमुळे निर्माण केल्यामुळे कृषिपूरक व्यवसाय वाढला आहे.

याप्रसंगी सुजित चौगुले, गंगाधर इटकर, रवी नंदराळे, सतीश कोळी, गुरू बिराजदार, संगमेश्वर बिराजदार, महानतेश बिराजदार, सुरेश बगले, दिपाली व्हनमाने, अमित मूलवाड, सिद्धराम घोडके, रवी बिराजदार, शिवानंद बंडे, शिवानंद डोमनाळे, मल्लिकार्जुन सुरवसे, सचिन बंडे, बनसिध्द वडरे, प्रकाश पुजारी, महादेव पुजारी, सरपंच शिवपुत्र तांडूरे, यलगोंडा बिराजदार, मसण्णा गायकवाड, गोविंद पाटील, पद्मयोगी वडरे, भीमाशंकर पुजारी, सुधाकर पुजारी उपस्थित होते.

Solapur South Assembly
Modi Government Big Decision: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट; 'UPS' ला मंजुरी

कै. देवकतेंइतकेच प्रेम राजूरने मला दिले

नदीकाठावरील शेतकऱ्यांची विजेची समस्या मिटावी, यासाठी आठ नवीन विद्युत उपकेंद्रे उभारली. हत्तरसंग वीज उपकेंद्रामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची मोठी सोय झाली असून पुरेशा दाबाने वीजपुरवठा आता होत आहे.

भीमा-सीना नदीजोड प्रकल्पामुळे नदीकाठच्या ५८ किलोमीटर अंतरात सिंचनासाठी बारमाही पाणी उपलब्ध होणार आहे. राजूर येथे नदीवर ९ कोटींची पूल बांधून ऊस बागायत शेतकऱ्यांच्या वाहतुकीची सोय केली. कै. आनंदराव देवकते यांच्या इतकेच प्रेम मला राजूरच्या मतदारांनी दिल्याचे आमदार देशमुख म्हणाले.

Solapur South Assembly
Sangli Assembly Election : महायुती सरकारचे मातंग समाजासाठी सकारात्मक निर्णय - अभिमन्यू भोसले

विकासकामांच्या जोरावर विजयाची हॅट्‍ट्रिक करू

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून १० वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपण या निवडणुकीत नक्कीच हॅट्‍ट्रिक करू, असा विश्वास आमदार देशमुख यांनी व्यक्त केला. अमृतनगर, गंगाधरनगर, वांगी, वडकबाळ येथील कॉर्नर बैठकांत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी नंदू पाटील, किशोर पवार, नरसिंह गुमटे, रवी सरमाळकर, शांताबाई शिंदे, प्रणव कुलकर्णी, उज्वला पाटील, छाया जाधव, ॲड. हेमंत माळी, ॲड. मंजुनाथ कक्कलमेळी, ॲड. स्नेहा सरभी, शामराव हांडे, राहुल पुजारी, सुनील व्हनमाने, होगेप्पा पुजारी, सिद्धप्पा बिराजदार, परसप्पा गडदे, सुनील व्हनमाने, विलास राठोड आदी उपस्थित होते. शिवयोगी नगरात देवानंद चिलवंत, विशाल गायकवाड, संगीता जाधव, सोसायटीचे अध्यक्ष पाटील उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com