Solapur South Assembly  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Subhash Deshmukh: दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी भाजपला साथ द्या

Subhash Deshmukh : ग्रामीण भागात विविध ठिकाणी बैठका

सरकारनामा ब्यूरो

Subhash Deshmukh: महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयापैकी शेतकरी वीज बिल माफ, लाडकी बहीण योजनेचा दक्षिण तालुका मतदारसंघातील हजारो लोकांना फायदा झाला आहे.

महायुती सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. त्यामुळे महायुतीला मतदान करून दक्षिण तालुक्यासह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला साथ द्यावी, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार देशमुख यांनी आज टाकळी, बरूर, बोळकवठे, संजवाड, होनमुर्गी आदी गावांना भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी आमदार देशमुख यांचे स्वागत केले.

महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे आम्हाला उद्योग, व्यवसायाला हातभार लागत असल्याचे सांगितले. आमदार देशमुख म्हणाले, मागील 25 वर्षांत जेवढा विकास झाला नाही, तेवढा विकास या 10 वर्षाच्या कार्यकाळात झाला आहे.

होटगी पर्यटन केंद्रासाठी 5 कोटींचा निधी, होटगी आश्रमशाळा आणि वसतिगृह बांधण्यासाठी 32 कोटी, हत्तरसंग कुडल देवस्थानसाठी 13 कोटी, नांदणी वन व उद्योग केंद्रासाठी 3 कोटी, हिरज रेशीम बाजारपेठेसाठी साडेसात कोटी, वडापूर बॅरेजसाठी 67 कोटी निधी मिळाला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण तालुक्याला भरभरून निधी दिला आहे. आगामी काळातही यापेक्षा जास्त निधी तालुक्यात आणणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा महायुतीने साथ द्यावी.

यावेळी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके,हणमंत कुलकर्णी, संदीप टेळे, अप्पासाहेब मोटे, अंबिका पाटील, सतीश कोळी, गुरू बिराजदार, संगमेश्वर बिराजदार, महानतेश बिराजदार, सुरेश बगले, दीपाली व्हनमाने,अमित मुलवाड, सिद्धराम घोडके,रवी बिराजदार, डॉ चनगोंडा हाविनाळे, संदीप टेळे, अप्पासाहेब मोटे, यतीन शहा, अंबिका पाटील, दीपाली व्हनमाने, सुजित चौगुले, गंगाधर इटकर, रवी नंदराळ, दीपाली व्हनमाने, बनसिध्द वडरे, माजी सोसायटी चेअरमन प्रकाश पुजारी, महादेव पुजारी, सरपंच शिवपुत्र तांडूरे, यलगोंडा बिराजदार, मसण्णा गायकवाड, गोविंद पाटील, पद्मयोगी वडरे, भीमाशंकर पुजारी, सुधाकर पुजारी तसेच गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT