Wai Assembly Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Arunadevi Pisal: अप्पांच्या सुनेला खंडाळकरांनी साथ द्यावी

Arunadevi Pisal: रमेश धायगुडे- पाटील; अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारार्थ कोपरासभा

सरकारनामा ब्यूरो

Arunadevi Pisal: माजी मंत्री (कै.) मदनराव पिसाळ यांनी मोठ्या दूरदृष्टीने धोम- बलकवडी धरणाची उभारणी केली. या पाण्यामुळे खंडाळा तालुक्यातील वाडीवस्तीवर पाणी पोचून दुष्काळी तालुक्याचा खंडाळ्याचा कलंक पुसला.

अप्पा सलग २० वर्षे विधानसभेत निवडून गेले. खंडाळ्याच्या पूर्व भागातील ३६ गावे फलटण मतदारसंघात समाविष्ट असल्याने त्यांना अप्पांच्या उपकाराची परतफेड करण्याची संधी मिळाली नव्हती.

या वेळी मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्या रूपाने अप्पांच्या सुनेला निवडून द्यावे, असे आवाहन माजी सभापती रमेश धायगुडे- पाटील यांनी केले.

खंडाळ्याच्या पूर्व भागातील ३६ गावांमध्ये आज महाविकास आघाडीच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारार्थ पदयात्रा, कोपरासभा आदींनी खंडाळा तालुका दणाणून सोडला. या वेळी ‘ रामकृष्ण हरी वाजवा तुतारी’च्या जयघोषात वहिनींना निवडून आणण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला. या वेळी डॉ. नितीन सावंत, रमेश शिंदे, बाळासाहेब शेळके, हणमंत धायगुडे, विठ्ठल धायगुडे, भगवान शेडगे, सचिन धायगुडे, विकास माने, शांतिलाल दशरथे आदी उपस्थित होते.

अरुणादेवी पिसाळ म्हणाल्या, ‘‘शरद पवार यांच्या कृपाशीर्वादाने ज्यांनी आयुष्यभर राजकारण केले. आमदार, खासदारकी जिल्ह्यातील महत्त्वाची पदे मिळवली. त्या जुन्या जाणत्या नेत्यांसोबत उघड उघड गद्दारी केलेल्या विद्यमान आमदारांना आता जनताच जागा दाखवेल.

वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्याची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, तरीही त्यांच्या बगलबच्च्यांकडून विकासाचा डांगोरा पिटला जात आहे. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे जन्मगाव असणाऱ्या मतदारसंघामध्ये महिलाशक्तीचा सन्मान करत महाविकास आघाडीने माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला उमेदवारी देत प्रतिनिधित्व करण्याची संधी निर्माण केली. जनतेने संधी दिल्यास मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र झटणार आहे.’’

राजेश शेटे यांचा प्रवेश

आमदार मकरंद पाटील यांचा निष्ठावंत कार्यकर्ता राजेश शेटे यांनी बोरी गावामध्ये अरुणादेवी पिसाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. खंडाळा तालुक्यात अरुणादेवी पिसाळ यांचे जल्लोषात स्वागत होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT