Arunadevi Pisal: डांगोरा पिटणाऱ्यांनी कोणता प्रकल्‍प आणला?

Arunadevi Pisal: भादे गटातील गावांसह लोणंद, शिरवळमध्‍ये प्रचारफेरी
Wai Assembly
Wai AssemblySarkarnama
Published on
Updated on

Arunadevi Pisal: मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासकामांचा डांगोरा पिटणाऱ्या आमदारांनी कोणता मोठा प्रकल्प आणला? किती तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला? कोणती संस्था उभी केली? हे सांगण्याची वेळ आता आली आहे, असा घणाघात अरुणादेवी पिसाळ यांनी आज केला.

वाई, खंडाळा, महाबळेश्‍‍वर मतदारसंघातील राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्‍या, महाविकास आघाडीच्‍या अधिकृत उमेदवार म्‍हणून खंडाळा तालुक्यातील भादे गटात आणि खंडाळा, शिरवळसह लोणंदमध्‍ये त्‍यांनी प्रचारफेरीद्वारे मतदारांशी संवाद साधला. त्‍या वेळी त्‍या बोलत होत्‍या.

Wai Assembly
Anuradha Nagawade यांचा Congress ला रामराम? |BJP|NCP|Maharashtra Assembly Elections 2024 |Sarkarnama

दरम्‍यान, अरुणादेवी पिसाळ यांना मतदारसंघातील पहिल्या महिला आमदार बनविण्यासाठी मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली असल्‍याचे रमेश धायगुडे- पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘या मतदारसंघाला विकासाचा दृष्‍टिकोन असणाऱ्या प्रतिनिधींची गरज अरुणादेवींच्या रूपाने पूर्ण होणार आहे. मतदासंघात आमदारांविरोधी सुप्‍त लाट आहे. सगळं मलाच, आम्हालाच पाहिजे, हा त्यांचा अट्टहास स्वाभिमानी मतदारांच्या जिव्हारी लागला असून, या मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे.

यावेळी पाडेगाव, बाळूपाटलाचीवाडी, पिंपरे, आंदोरी, मरिआईचीवाडी, बावकलवाडी, वाघोशी, कराडवाडी, वाठार कॉलनी, शेडगेवाडी, भादे, तोंडल, लोणी, भोळी, मोर्वे या गावांत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्‍याचेही अरुणादेवी पिसाळ यांच्‍या समर्थकांनी सांगितले.

Wai Assembly
Prabhakar Gharge: म्‍हसवडचा पाणीप्रश्‍‍न प्रलंबित का?

फोडाफोडीला जनता कंटाळली

विद्यमान आमदार जो गट, पक्ष, संघटना त्यांना पाठिंबा देतात त्यांना निकामी करतात. या तिघा भावांच्या गटबाजी आणि फोडाफोडीच्या राजकारणाला खंडाळा तालुक्यातील जनता कंटाळली आहे. उदयनराजेंच्या लोकसभा निवडणुकीवेळी आमदार गट कोणाचे काम करत होता, हे जगजाहीर आहे.

ते महायुतीचा धर्म पाळत नसतील तर आम्हीही पाळणार नाही. गेली १५ वर्षे नाकर्तेपणाला कंटाळून आम्ही अरुणावहिनींच्या विजयासाठी झटत आहोत, असे भाजपचे हर्षवर्धन शेळके-पाटील यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com