Nitesh Rane
Nitesh Rane sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nitesh Rane News: काही पोलिस अधिकाऱ्यांना वाटतंय की 'महाविकास'चे सरकार आहे...नितेश राणे

Umesh Bambare-Patil

सातारा : हिंदू समाजातील मुलींना न्याय मिळावा, यासाठी हिंदू समाज म्हणून आम्हाला लव्ह जिहाद कायद्याची गरज आहे. पण, अशा काही घटना अशा घडल्या आणि केस झाल्यानंतर काही आजी पोलिस अधिकाऱ्यांना वाटते की आजही महाविकासचेच सरकार आहे. पण हा त्यांचा गैरसमज आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सक्षम असून ते हिंदू समाजावर अन्याय झाला तर ते गप्प बसणार नाहीत, असा सज्जद दम आमदार नितेश राणे यांनी पाटणमध्ये दिला.

पाटण (जि. सातारा) येथे लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर आज हिंदू समाजाने आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात आमदार नितेश राणे, विक्रम पावसकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते. या नंतर आमदार राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार राणे म्हणाले, हिंदू समाजाने आज एकत्र येऊन समाजाची ताकत दाखवून एक संदेश दिला आहे. पुन्हा असे श्रद्धा प्रकरण होऊन नये, यासाठी सक्षम धर्मांतर विरोधी कायदा यावा. यातून हिंदू मुलींना न्याय मिळायला हवा.

विविध माध्यमातून हिंदू समाजावर दबाव टाकला जात आहे, याविरोधात आम्ही मोर्चा काढला असून याबाबतचे निवेदन आम्ही तहसीलदारांना दिला आहे. हा विषय सरकारपर्यंत पोचवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. नितेश राणे म्हणाले, हा मोर्चा कोणत्या पक्षाचा नसुन समाज म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. कोण आमदार, खासदार किंवा कोण कोणत्या पक्षाचा पदाधिकारी आहे, हे महत्वाचे नाही. या मोर्चात भगव्या झेंड्याखाली सर्वजण एकत्र आले आहेत.

अशा काही घटना अशा घडल्या आणि केसेस झाल्यानंतर काही आजी पोलिस अधिकारी आहेत, त्यांना वाटते की आजही महाविकास आघाडीचेच सरकार आहे. त्यांना वाटते गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलच आहेत, नवाब मलिक मंत्री आहेत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत असे त्यांना वाटत आहे. पण, हा त्यांचा गैरसमज आहे. मला त्यांना जाणीव करुन द्यायची की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत. हिंदू समाजावर अन्याय झाला तर ते गप्प बसणार नाहीत. आम्ही जागृतता केलेली असून आवाज उठविल्यावर सरकारकडून निर्णय होईल, असे आम्हाला वाटते.

लव्ह जिहाद प्रकरणावर तुम्ही आक्रमक झाला आहात. लव्ह जिहादचा तुम्ही चेहरा बनू पाहत आहात का, या प्रश्नावर नितेश राणे म्हणाले, लव्ह जिहादच्या विरोधात कायद्याची गरज आहे. आपल्याकडे सक्षम कायदा नसल्याने हिंदू मुलींना संरक्षण देता येऊ शकत नाही. मी एक चेहरा नाही, हिंदू समाज म्हणून आम्हाला लव्ह जिहाद कायद्याची गरज आहे. हिंदू समाजाची ही मागणी आहे. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी हिंदू कार्यकर्ता म्हणून मी राबवत असतो. त्यासाठी असंख्य कार्यकर्ते यामध्ये येतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT