Balasaheb Patil, Eknath shinde
Balasaheb Patil, Eknath shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : राज्यात मोदींच्या विचारांचे लोक सत्तेत; त्यांचा गुजरातकडेच ओढा...

हेमंत पवार

कऱ्हाड : महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे लोक सत्तेत आले आहेत. त्या लोकांचा ओढा गुजरातकडेच आहे. त्यामुळे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाने महाराष्ट्राला प्राधान्य दिले असतानाही तो प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला. हा प्रकल्प राज्यातून गेल्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे, असा आरोप माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला आहे.

कराड येथील विश्रामगृहात आय़ोजित पत्रकार परिषदेत आमदार बाळासाहेब पाटील बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, वेदांता फॉक्सकॉन हा मोठा प्रकल्प राज्यात होऊ घातला होता. या प्रकल्पामुळे रोजगार तर मिळणार होताच शिवाय राज्याच्या विकासात भर पडणार होती. वेदांता प्रकल्पाने सर्च रिपोर्ट पाहिला तर त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राला प्राधान्य दिले होते.

राज्य सरकारने त्यांना मोठ्या सवलती दिल्या होत्या. मात्र, सरकार बदलल्यानंतर बरेच निर्णय रद्द करण्यात आले. अनेक कंपन्याही राज्यातून पळवण्यात आल्या. दोन महिन्यात असे काय घडले की हा प्रकल्प राज्यातून गेला आणि गुजरातला गेला. महाराष्ट्रात नरेंद्र मोदी विचारांचे लोक सत्तेत आले आहेत. या लोकांचा गुजरातकडे ओढा आहे. त्यामुळे तो प्रकल्प गुजरातला गेला.

राज्य शासन गाफील राहिले. त्याचा फायदा उचलत हा प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला. महाराष्ट्राला अन्य प्रकल्प देण्यात येतील असे सांगण्यात येत आहे. मात्र, राज्यातून हा प्रकल्प का गेला हा प्रश्न आहे. राज्यात सत्ता बदल होऊन दोन महिने उलटले तरी अजूनही पालकमंत्र्यांची नेमणूक झालेली नाही. मंत्रिमंडळ विस्तारही झालेला नाही.

सण, उत्सव झालेच पाहिजेत पण विकास कामाकडेही या सरकारने प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. मी पहिल्यांदा आमदार म्हणुन निवडुण गेलो त्यावेळी होणारी भाषणे आणि सध्याची भाषणे यात तफावत आहे. विधीमंडळात चर्चा हे कायद्यावर होणे आवश्यक आहे. ती चर्चा अलिकडच्या काळात कमी प्रमाणात होत आहे.

राणे भाजपला पुरकच बोलतात...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेच्या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले, टीका करणे सोपे असते. नारायण राणे हे सुरुवातीला शिवसेनेमध्ये होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि आता भाजपमध्ये आहेत. त्यामुळे पक्षाला पूरक असलेले ते बोलत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचा राग दिसतोय म्हणून ते अशी टीका करत आहेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT