Mahesh Shinde, Shashikant Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Koregaon : कोरेगावच्या लोकप्रतिनिधींचे खोक्याला प्राधान्य...शशिकांत शिंदे

Shashikant Shinde आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, कोरेगाव मतदारसंघाचा कायापालट करण्यात यश मला आले.

सरकारनामा ब्युरो

Pusegaon News : महाविकास आघाडी सरकारने Mahavikas Aghadi अडीच वर्षात जनहिताला प्राधान्य देऊन राज्यासह कोरेगाव मतदारसंघात Koregaon विकासकामे केली. परंतु कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी जनतेच्या विकासाला प्राधान्य देण्याच्या ऐवजी खोक्याला प्राधान्य दिले. या चुकीच्या प्रवृत्तीला जनतेने थारा देऊ नये, असा टोला आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी महेश शिंदे Mahesh Shinde यांचे नाव न घेता लगावला.

राजापूर व बुध येथे विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, मानाजी घाडगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब इंगळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, २००९ पूर्वी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये मूलभूत सुविधा पोहचलेल्या नव्हत्या. दहा वर्षाच्या कालावधीत मतदारसंघांमध्ये सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजना, रस्त्यांचे जाळे, जलसंधारणाच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडविणे, शिक्षण, आरोग्य यासह विविध विकासकामे साकारली गेलीत. त्यामुळे कोरेगाव मतदार संघाचा कायापालट करण्यात यश मला आले.

सारंग पाटील म्हणाले, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून राजापूर येथील जलजीवन योजना मार्गी लागली आहे. त्यामुळे राजापूरकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. उत्तर खटावच्या कार्यक्षेत्रातील गावांना भविष्यात निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. सुरेश जाधव म्हणाले, केंद्र सरकारने 'अच्छे दिन' चे स्वप्न दाखविल्याने भाजपला देशात व राज्यात सत्ता मिळाली. मात्र, गेल्या ९ वर्षात जनतेला अच्छे दिन आणण्याऐवजी बुरे दिन आणण्यात भाजप यशस्वी झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT