Solapur, 14 August : अक्कलकोटचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळी घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या श्रीशैल हुळ्ळे (रा. वडगाव, ता. दक्षिण सोलापूर) याला सोलापूरच्या सदर बझार पोलिस ठाण्याच्या पथकाने कोल्हापुरातील किणी टोल नाक्याजवळ पकडले. हुळ्ळे याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, आमदार कल्याणशेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा हुळ्ळे याच्या गाडीचा चालक प्रभाकर फुलारी याला पळून जाताना यापूर्वीच इंदापूर तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकारामागे नेमके कोण होते, हे तपासून पुढे येणार की नाही, असा प्रश्न आहे.
भारतीय जनता पक्षाचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे शुक्रवारी (ता. ७ ऑगस्ट) कपडे खरेदीसाठी सोलापूर शहरातील महावीर चौक परिसरात असलेल्या प्युमा शोरूममध्ये गेले होते. त्यावेळी शोरूमबाहेर गाडीत त्यांचे चालक आनंद सुरवसे हे बसले होते.
आमदार कल्याणशेट्टी यांचे चालक आनंद सुरवसे हे शोरूमबाहेर गाडीत बसलेले असताना त्याठिकाणी श्रीशैल हुळ्ळे आणि प्रभाकर फुलारी आले. त्या वेळी हुळ्ळे याने आमदाराच्या गाडीचे चालक सुरवसे यास पैशांचे आमिष दाखवून आमदाराला गोळी घालून जीवे मारण्यासाठी प्रवृत्त केले होते.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे चालक सुरवसे यांनी याबाबतची फिर्याद सदर बझार पोलिस ठाण्यात दिली होती. त्या फिर्यादीवरून हुळ्ळे व फुलारीविरूद्ध ९ ऑगस्ट रोजी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. यात सहायक पाेलिस निरीक्षक राहुल सावंत यांच्या नेतृत्वातील पथकाने संशयित आरोपी प्रभारी फुलारी यास तातडीने अटक केली होती. त्याला पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर टोलनाक्याजवळ बसमधून ताब्यात घेण्यात आले होते.
फरारी असलेला हुळ्ळे हा पोलिसांना सापडत नव्हता. मात्र तो कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची कुणकुण लागताच पोलिसांनी त्याला कोल्हापुरातील किणी टोल नाक्याजवळून ताब्यात घेतले. त्याला आज (शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.