Rupali Chakankar 
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan Doctor Death: पीडित डॉक्टर महिलेला तक्रार करुनही मदत का नाही मिळाली? महिला आयोगानं पोलिसांना विचारला जाब; दिले 'हे' आदेश

Phaltan Doctor Death: फटलण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाची महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

Amit Ujagare

Phaltan Doctor Death: सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरनं आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून जीवन संपवलं आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे एका पोलीस अधिकाऱ्यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं तसंच ती भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या घरमालकाच्या मुलानंही तिला मानसिक त्रास दिल्याचं तिनं आपल्या नोटमध्ये नमूद केलं आहे. या प्रकरणाची राज्यात सर्वत्र चर्चा सुरु झाल्यानंतर आता महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे.

महिला आयोगानं यासंदर्भात ट्विट केलं असून यात म्हटलं की, पोलिस निरीक्षक गोपाल बदने यानं केलेल्या लैंगिक अत्याचारामुळं पीडित डॉक्टर महिलेनं जीवन संपवल्याचं सुसाइड नोटमुळं समोर आलं आहे. तसंच घर मालकाचा मुलगा प्रशांत बनकर यानं तिला मानसिक त्रास दिल्याचंही यात नमूद केलं आहे. सद्यस्थितीत याप्रकरणी फलटण सिटी पोलीसमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (2) (N), 108 प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यासाठी शोधपथक रवाना करण्यात आलं आहे.

मृत डॉक्टर महिलेचं पार्थिव शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. फरार आरोपींचा तातडीनं शोध घेऊन संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा असे निर्देश आयोगाने साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. पीडित महिलेनं यापूर्वी आपल्याला होत असलेल्या त्रासाबाबत पोलिसांमध्ये तक्रार केली असल्यास त्यांना मदत का मिळाली नाही? याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा सूचनाही यावेळी आयोगानं पोलिसांना दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT