Chhagan Bhujbal sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Naigaon : फुले दांपत्याने बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दिला...भुजबळ

Chhagan Bhujbal माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नायगांव या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळास आज भेट देऊन अभिवादन केले.

सरकारनामा ब्युरो

Satara News : क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या साथीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सर्व समाजातील महिलांना शिक्षणाचे कवाड खुल करून दिलं. त्यामुळे चूल आणि मूल या चार भिंतींच्या आत अडकलेल्या महिलांना समाजात सर्व स्तरांत मुक्तपणे संचार करणे शक्य झालं. त्यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी व्यक्त केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नायगांव या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळास आज भेट देऊन अभिवादन केले.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रित्येश गवळी, अॅड. सुभाष राऊत, प्रा.दिवाकर गमे, राजेंद्र नेवसे, समाधान जेजुरकर, अॅड. चंद्रशेखर भुजबळ, संतोष खैरनार, वैष्णवी सताव, नायगावच्या सरपंच साधना नेवसे उपस्थित होते.

छगन भुजबळ म्हणाले, व्यवस्थेच्या अंधःकरात अडकलेल्या बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश देऊन समाजाच्या मुख्य समाजात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या साथीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. सर्व समाजातील महिलांना शिक्षणाचे कवाड खुल करून दिलं.

त्यामुळे चूल आणि मूल या चार भिंतींच्या आत अडकलेल्या महिलांना समाजात सर्व स्तरांत मुक्तपणे संचार करणे शक्य झालं. त्यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत आहे. त्यांनी केलेलं हे कार्य चिरकाल स्मरणात राहिल. क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT