Satara News : सातारा मेडिकल कॉलेजमधील भंगार विक्रीचा मुद्दा विधानपरिषदेत; आता होणार चौकशी!

shashikant Shinde : मेडिकल कॉलेज च्या भंगार चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करावेत
Satara News | Shashikant Shinde |Girish Mahajan
Satara News | Shashikant Shinde |Girish Mahajan Sarkarnama
Published on
Updated on

सातारा : सातारा मेडिकल कॉलेजच्या नियोजित जागेतील भंगार चोरी प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत केली. त्यांचा हा मुद्दा आमदार महादेव जानकर, जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लावून धरला. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. शेवटी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी लावण्याचे आदेश दिले.

Satara News | Shashikant Shinde |Girish Mahajan
Mahesh Landge and Ajit Pawar : आमदार महेशदादांच्या मागणीला अजितदादांची साथ!

सातारा मेडिकल कॉलेजच्या नियोजित जागेतून भंगार चोरीस गेले आहे. याबाबत आज राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात आवाज उठवला. मेडिकल कॉलेज च्या भंगार चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

शिंदेंचा हा मुद्दा आमदार महादेव जानकर, आमदार जयंत पाटील, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उचलून धरला, या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहात एकच गदारोळ उडाला. त्यामुळे सभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री महाजन यांना याचे उत्तर देण्यास सांगितले. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी लवकरच या प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केली जाईल, असे सांगितले.

Satara News | Shashikant Shinde |Girish Mahajan
Winter Session : वेदांत प्रकल्पासाठी आमदार शेळके अजूनही आग्रही; म्हणाले, हिरावलेला रोजगार कोण देणार?

सातारा मेडिकल कॉलेजच्या नियोजित जागेत कृष्णा खोरे महामंडळाच्या काही जुन्या इमारती होत्या, त्या पाडण्यात आल्या आहेत. या इमारती पडताना मोठ्याप्रमाणात भंगार सापडले आहे. या भंगाराचा लिलाव करून त्यातून शासनाला महसूल मिळाला असता पण, रातोरात हे भंगार पळविण्यात आले असल्याचा आरोप, आमदार शिंदे यांनी केला आहे.

याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रमेश उबाळे यांनी उपोषण करून भंगार चोरणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. या उपोषणास आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे यांनी पाठिंबा दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com