Pimpri Chinchwad Mahayuti protest  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti Protest : आंदोलनात महायुतीची मोठी चूक! स्वतःच्या सरकारविरोधात घोषणा; नेत्यांची फजिती अन् सोशल मीडियावर चर्चा

Pimpri Chinchwad BJP Shivsena NCP protest against NDA : महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि मित्रपक्षांना लक्ष्य करण्यासाठी भाजप नेत्यांसह शिवसेना अन् राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनात मात्र त्यांचीच झालेली फजिती चर्चेचा विषय ठरला आहे.

Aslam Shanedivan

  1. महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात झालेल्या आंदोलनात महायुतीच्या नेत्यांकडून चुकून NDA सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.

  2. ही चूक लक्षात येताच नेत्यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.

  3. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पिंपरी-चिंचवडमध्ये याची चर्चा सुरू आहे.

Pimpri Chinchwad News : केंद्रातील NDA सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयक फसले असून याविरोधात आता राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात विविध ठिकाणी भाजपसह शिवसेना अन् राष्ट्रवादी (महायुती)कडून काँग्रेसचा निषेध केला जात आहे. पण पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र आंदोलनांच्या गडबडीत भाजप नेत्यांसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे भान सुटल्याचे समोर आले आहे. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध करण्याऐवजी भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी चक्क केंद्र व राज्यातील आपल्याच 'NDA' सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचे समोर आले आहे. ज्याची आता राज्यभर चर्चा होताना दिसत आहे. तर आता या आंदोलनामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे.

महापालिकेच्या परिसरात महायुतीच्या वतीने महाविकास आघाडीविरोधात महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्यावरून निषेध करण्यात आला. यावेळी भाजपसह सत्ताधारी पक्षांनी काँग्रेस आणि मित्रपक्षांना लक्ष्य केले. यावेळी भाजप आमदार उमा खापरे, माजी महापौर रवी लांडगे आणि सत्ताधारी पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्यासह मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते.

पण महाविकास आघाडीविरोधात आंदोलन करण्याऐवजी या नेत्यांनी एनडीएचा निषेध केला. आपल्याच सरकारला लक्ष्य केले. आंदोलना दरम्यान प्रशांत शितोळे यांनी "या सरकारचं करायचं काय?" अशा जोरदार घोषणा दिल्या. ज्यावर कार्यकर्त्यांनी "खाली डोकं, वर पाय" म्हणत परिसर दणाणून सोडला. ही चूक एकदा नाही तर पुन्हा पुन्हा करण्यात आली.

शितोळे यांनी या "NDA सरकारचं करायचं काय?" अशी घोषणा देताच कार्यकर्त्यांनी जोशात "खाली डोकं, वर पाय" म्हणत जोरदार नारा दिला. या सर्वांनी केंद्रात आणि राज्यात आपलीच सत्ता म्हणजेच NDA चं सरकार असतानाही अशा घोषणा दिल्या. यावेळी उपस्थितांच्याही भूवया उंचावल्या.

तर आपण आपल्याच सरकारविरोधात घोषणा देत असल्याची जाणीव होताच नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर आमदार उमा खापरे यांनी तातडीने विजयाच्या घोषणा देऊन वेळ मारून नेली. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आपल्याच सरकार विरोधता दिलेल्या घोषणा कॅमेऱ्यात कैद झाल्या.

तर सत्ताधाऱ्यांनी विरोधांना अंगावर घेण्याऐवजी आपल्याच "NDA" सरकारला शिंगांवर घेत 'सेल्फ गोल' केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तर या आंदोलनामुळे आता भाजपसह सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीची चांगलीच तारांबळ उडाल्याचे समोर आले आहे.

FAQs :

1. ही घटना कुठे घडली?
पिंपरी-चिंचवड येथे ही घटना घडली.

2. आंदोलन कशासाठी करण्यात आले होते?
महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते.

3. नेत्यांनी काय चूक केली?
त्यांनी चुकून NDA सरकारविरोधात घोषणा दिल्या.

4. ही चूक कशी सुधारण्यात आली?
नंतर “NDA चा विजय असो” अशा घोषणा देऊन परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.

5. या घटनेची प्रतिक्रिया काय आहे?
ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT