BJP–NCP Politics : नामुष्की टाळण्यासाठी भाजप-राष्ट्रवादीची 'सेटलमेंट', एका अध्यक्षपदावर बोळवण?

PMC BJP NCP : 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीची पुनर्रचना केली आहे. यामध्ये भाजपच्या ताब्यात 14 क्षेत्रीय कार्यालये येत असून काँग्रेसकडे फक्त एक क्षेत्रीय कार्यालय आले आहे. मात्र, राष्ट्रवादीला एकही क्षेत्रीय कार्यालय न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
Alleged BJP-NCP ‘settlement’ in Pune Municipal Corporation ward committees triggers political reactions.
Alleged BJP-NCP ‘settlement’ in Pune Municipal Corporation ward committees triggers political reactions.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यामध्ये सत्तेत एकत्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे पुणे महापालिकेत एकामेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसपूस पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीनंतर करण्यात आलेल्या वॉर्ड रचनेच्या निमित्ताने देखील हे दोन्ही पक्ष आमने-सामने आले. मात्र सरतेशेवटी राज्यातील दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या दबावपोटी स्थानिक नेत्यांना या वॉर्ड समितींच्या वादात सेटलमेंट करावी लागली असल्याची चर्चा आहे.

महापालिकेत नव्याने 32 गावे समाविष्ट करण्यात आली आहे. या समाविष्ट गावांना जवळच्या क्षेत्रीय कार्यालयांशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे काही क्षेत्रीय कार्यालयांचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे काही ठिकाणी सोयीसाठी तर काही ठिकाणी अंतरामुळे नगरसेवकांनी क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बदल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभाग आणि निवडणूक विभागाने लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन हद्द निश्चित केल्या आहेत. यात काही क्षेत्रीय कार्यालयांची नावेही बदलण्यात आली आहेत.

त्यानुसार 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीची पुनर्रचना केली आहे. यामध्ये भाजपच्या ताब्यात 14 क्षेत्रीय कार्यालये येत असून, काँग्रेसकडे फक्त एक क्षेत्रीय कार्यालय आले आहे. तर, महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे 27 नगरसेवक असूनही त्यांच्या वाट्याला एकही क्षेत्रीय कार्यालय येत नसल्याचे चित्र तयार झाले होते.

Alleged BJP-NCP ‘settlement’ in Pune Municipal Corporation ward committees triggers political reactions.
BJP Politics : पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या हुशारीला CM देवेंद्र फडणवीसांचा दणका : सुनेत्रा पवारांच्या पत्राची दखल

त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी चालाखीने राज्यात मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचाच काटा काढला असल्याची चर्चा या निर्णयानंतर सुरू होती. मात्र या सर्व प्रकारानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले असल्याचं सांगितले जात होते. त्यानंतर फडणवीस यांनी देखील नगरविकास मंत्रालयाला याबाबत चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि तसेच वेळ पडल्यास क्षेत्रीय कार्यालयाच्या केलेल्या रचनेत बदल करण्यास देखील सांगितले होते.

भाजपकडील अध्यक्षपद राष्ट्रवादीला?

फडणवीस यांनी दिलेल्या या सूचनेनंतर क्षेत्रीय कार्यालयाची नव्याने करण्यात आलेली रचना बदलण्याची नामुष्की आपल्यावरती येऊ नये या दृष्टीकोनातून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला एक क्षेत्रीय कार्यालय देऊन त्यांची बोळवण केली असल्याचं बोलले जात आहे. ज्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयमध्ये भाजपचे पाच आणि काँग्रेसचे तीन नगरसेवक आहेत तर राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक असलेल्या या क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष पद भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ केले आहे. त्यामुळे या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये सेटलमेंट झाली असल्याची चर्चा सध्या पालिकेच्या राजकीय वर्तुळात सुरू असल्याच पाहायला मिळत आहे.

Alleged BJP-NCP ‘settlement’ in Pune Municipal Corporation ward committees triggers political reactions.
KDMC standing committee: 'केडीएमसी'चा गड कोणाचा? सत्तेच्या उबेतही भाजप-शिंदे शिवसेनेत शीतयुद्ध; 'या' मुद्द्यावरून दोन्ही पक्षात जुंपली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com