Narendra Modi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Narendra Modi : चर्चा तर होणारच... 40 मिनिटांच्या भाषणात PM मोदींकडून तब्बल 18 वेळा 'गॅरंटी'!

PM Modi Solapur Visit : 'मोदी गॅरंटी' म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची संपूर्ण गॅरंटी, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी ते शब्द पाळणारे राजकारणी आहोत, असे सांगितले.

Roshan More

Solapur : गेल्या वर्षी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात 'मोदी गॅरंटी' या शब्दाचा वापर वारंवार करीत आहेत. आज (शुक्रवारी) सोलापूर येथे उभारल्या गेलेल्या 'रे-नगर' गृहनिर्माण प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. सोलापूरमधील मोदींचे भाषण 'गॅरंटी' या शब्दाच्या वापराबाबत अपवाद ठरले नाही. आपल्या 40 मिनिटांच्या भाषणात तब्बल 18 वेळा 'गॅरंटी' शब्दाचा उच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

'रे-नगर' गृहनिर्माण प्रकल्पाच्या भूमिपूजन आपण केले होते. त्याचे लोकार्पणदेखील करीत आहोत, 'मोदी गॅरंटी' म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची संपूर्ण गॅरंटी, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी (Narendra modi) ते शब्द पाळणारे राजकारणी आहोत, असे सांगितले. तसेच घराची चावी देण्याची गॅरंटी दिली होती. ती पूर्ण केली. आपण दोन गॅरंटी पूर्ण केल्या आहेत, असे मोदी यांनी ठणकावून सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपल्या योजनांची माहिती देताना देशाची अर्थव्यवस्था (Economy) जगात तिसऱ्या क्रमांकाला घेऊन जाण्याची, सामाजिक न्यायाची, तसेच रेशनकार्डवर देशात कुठेही राशन मिळण्याची गॅरंटी मोदींनी आपल्या भाषणातून दिली. कामगार, गरिबांना बँका (Bank) कर्ज देत नव्हता. ते गॅरंटी म्हणून काय देणार, असा प्रश्न होता. मात्र, गरीब नागरिकांनादेखील कर्ज मिळाले पाहिजे. यासाठी आपण बँकांना गॅरंटी दिली. त्यामुळे गरिबांना कर्ज मिळत असल्याचे मोदींनी सांगितले.

'मोदी गॅरंटी'वर भर का?

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांकडून विविध कल्याणकारी योजनांची घोषणा करण्यात आली होती. त्याच वेळी भाजपनेदेखील कल्याणकारी योजना घोषित केल्या होत्या. त्यावेळी नेमका कोणावर विश्वास ठेवायचा, असा मतदारांमध्ये संभ्रम होता. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी आपण गॅरंटी घेत असल्याचे जाहीर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटीमुळेच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये पुन्हा भाजप सरकार आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोदी पुन्हा पुन्हा 'मोदी गॅरंटी'वर भर देत असल्याचे सांगितले जात आहे.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT