पश्चिम महाराष्ट्र

वाळू माफियांचे धाबे दणाणले; महसूल विभागासह पोलिसांची धडक कारवाई

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : बेकायदा वाळू वाहतूकप्रकरणी महसूल विभागासह (Department of Revenue) करमाळा पोलिसांनी (Karmala Police) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी उजनी जलाशयाच्या काठावर एक बोट नष्ट करण्यात आली असून दोन टिपर व वाळू असा सुमारे २४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, पाच वाळू माफियांवर गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी (ता. २२) करमाळा पोलिस व महसूल विभागाने केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

करमाळा पोलिस व महसूल विभागाला या वांगी गावात बेकायदा वाळू वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांना दिसली. पोलिसांनी उजनी धरणाच्या काठावरील वांगी गावाच्या परिसरात केली. दोन टीपर वाळू वाहतूक करत असल्याचे त्यांना आढळून आले. यांनतर करमाळा महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने अवैध वाळू उपसा सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन कारवाई केली. यामध्ये पाण्यातून वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी नष्ट करण्याल आल्या. तर दोन टिपर आणि वाळू असा 24 लाख रुपयांना मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत पोलिसांनी युवराज आंधळकर, दादा विटकर (दोघे रा. पांडे,), आबा मारकड, बाळासाहेब भगत (सर्व रा.चिखलठाण ) यांच्यावर संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय एकाचे नाव अद्याप समोर आलेले नाही

शनिवारी वांगी गावातील परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना एक टिपर वाळू भरत असल्याचे दिसले. पाण्यात एक मोठी यांत्रिक बोट व एक छोटी सेक्शन बोटही त्यांना आढळून आली. मात्र अंधाराचा फायदा घेत काहीजण पळून पाण्यात उडया मारुन पळून गेले. या बोटीत सुमारे 10 ब्रास वाळू पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 10 लाखाची एक मोठी व छोटी अशा दोन बोटी व त्यातील 10 ब्रास वाळू, १४ लाखाचे दोन टिपर जप्त केले असून संशयित आरोपींच्या विरोघात गुन्हा दाखल झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT