Chandrakant Patil-Ajay Mindargikar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला तडीपारीची नोटीस

Bhim Army activist : या कारवाईमुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी ‘सरकारच्या चुकीच्या निर्णयाला विरोध करायचा नाही काय,’ असा सवाल उपस्थित केला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला तडीपार करण्याची नोटीस सोलापूर शहर पोलिसांकडून देण्यात आली आहे. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी ‘सरकारच्या चुकीचा निर्णयाला विरोध करायचा नाही काय,’ असा सवाल उपस्थित केला आहे. (Police notice to expel Bhim Army activist from two districts for throwing ink on Chandrakant Patil)

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सोलापूरचे पालकमंत्रिपद राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवले होते. पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील हे प्रथमच सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी राज्य सरकारने खासगी/कंत्राटी भरतीचा शासकीय निर्णय मागे घ्यावा, यासाठी भीम आर्मीचे कार्यकर्ते अजय मैंदर्गीकर यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर शाई फेकली होती. त्यावेळी त्यांच्यावर विविध कलमे लावून कारवाई करण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी भीम आर्मीचे अजय मैंदर्गीकर यांच्या विरोधात भारतीय दंड विधान ३५३ आणि ३३२ अन्वये सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना सलग २६ दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते .

तब्बल २६ दिवसांनंतर जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या अजय मैंदर्गीकर यांचे ऑल इंडिया पँथर सेना, भीम आर्मी आणि विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत करण्यात आले होते. मात्र, तुरुंगातून सुटून बाहेर आलेल्या मैंदर्गीकर यांंना सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतून तडीपार करण्याची नोटीस देण्यात आलेली आहे. त्यामुळे आंबेडकरी कार्यकर्त्यांंमध्ये मोठा असंतोष उफाळला आहे.

सरकारचे चुकीचे धोरण अथवा निर्णयाविरोधात सर्वसामान्यांनी आवाज उठवायचा की नाही, असा सवाल या कारवाईमुळे संतप्त झालेल्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या कारवाईनंतर संतप्त झालेल्या जनतेच्या भावना पाहून पोलिस प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT