Chandrakant Patil News : मी कशालाही तयार असतो...माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?

BJP Minister : दोनदा शाई फेकली, त्या दोन्ही वेळा मी तिसऱ्या मिनिटाला बाहेर पडलो. सोलापूरमध्ये तर मी पाचशे निवेदन स्वीकारली.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Amravati News : दोन वेळा शाईफेकीची घटना घडल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते तथा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सध्या केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. मी कशासाठीही तयार असतो, माझ्या बॅगमध्ये आठ शर्ट असतात. शाई फेकली की मी लगेच दुसरा शर्ट घालतो. आतापर्यंत दोनदा शाई फेकली, पण मी तिसऱ्या मिनिटाला लगेच बाहेर पडतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी शाईफेकीवर दिली आहे. (I have eight shirts in my bag : Chandrakant Patil)

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांची ही प्रतिक्रिया आता चांगलीच चर्चेत आली आहे. अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. नुकताच त्यांनी अमरावतीच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrakant Patil
Chandrapur Congress : चंद्रपूर काँग्रेसमध्ये नवनियुक्त्या; देवेंद्र बट्टे जिल्हा उपाध्यक्ष, तर झाडेंकडे शहराची धुरा!

भाजपचे वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांच्यावर समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याने पुण्यात शाईफेक केली होती. त्यानंतर सोलापूर दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहामध्ये भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटी भरतीविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला होता. यावर चंद्रकांत पाटलांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. त्यांचे ते वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. माझ्या बॅगेत आठ शर्ट असून, शाई फेकली की लगेच दुसरा शर्ट घालतो आणि तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो, अशी खोचक प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

अमरावती येथे माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, आज मी खूप सर्वसामान्य माणसांना भेटलो. अजूनही काही भेटायचे बाकी असतील, तर आणखी भेटतो. जिल्हाधिकारी यांनी काळजी घेतली. मात्र, त्यांना मी म्हटलं काही होत नाही, व्हायचं असेल तर सुटत नाही. मी कशालाही तयार असतो. माझ्या बॅगेमध्ये आठ शर्ट असतात, त्यामुळे शाई फेकली की दुसरा शर्ट घालतो. लगेच काम सुरू. दोनदा शाई फेकली, त्या दोन्ही वेळा मी तिसऱ्या मिनिटाला बाहेर पडलो. सोलापूरमध्ये तर मी पाचशे निवेदन स्वीकारली. गर्दीचा फायदा घेऊनच शाई फेकली, त्यावेळी मी जिल्हाधिकारी यांना म्हटलं की इतकी ओव्हर सिक्युरिटी नको. सर्वसामान्य माणसांना त्रास होऊ नये, ते त्यांनी मान्य केलं, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Chandrakant Patil
Solapur Politics : सुशीलकुमार शिंदेंची लोकसभेसाठी मोर्चेबांधणी; राजन पाटलांची अनगरच्या वाड्यावर जाऊन घेतली भेट

शाई फेकणाऱ्यांना चंद्रकांतदादांचे उत्तर

दोन वेळा शाई फेकण्यात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी केलेलं हे वक्तव्य म्हणजे शाई फेकणाऱ्यांना त्यांनी दिलेलं उत्तरच म्हणावं लागेल. शाईफेकीनंतर एकप्रकारे त्यांनी ही ‘योजना’च आखल्याची चर्चा त्यांच्या या वक्तव्यानंतर सुरू झाली आहे. तुम्ही कितीही शाई फेका, मी माझं काम करीत राहील, असंच काहीसं चंद्रकांत पाटील यांना तर सांगायचं नसेल ना?

Chandrakant Patil
Dharmarao Baba Atram News : प्रफुल्ल पटेलांच्या गोंदियासाठी धर्मरावबाबा आत्राम यांना वेळ मिळेना...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com