Gambling  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शाळा सोडून जुगार गुरुजींना पडला महागात अन् हाती पडल्या बेड्या!

जुगार अड्ड्यांवर कारवाईचा पोलिसांनी (Police) सपाटा लावला आहे.

सरकारनामा ब्युरो

मंगळवेढा : जुगार अड्ड्यांवर कारवाईचा पोलिसांनी (Police) सपाटा लावला आहे. येथे पाटबंधारे विभागाच्या जागेत सुरू असलेल्या जुगारावर (Gambling) पोलिसांनी छापा (Raid) टाकला. विशेष म्हणजे, यात प्राथमिक शाळेचे गुरूजीच (Teacher) पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणी गुरूजींसह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या छाप्यात 2 लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ माने यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. कचरेवाडी परिसरात दिलीप मेटकरी यांच्या घरासमोर असलेल्या पाटबंधारे विभागाच्या जागेत जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी तिथे तीन पानी जुगार पैशावर खेळत असल्याचे दिसले. छापा पडताच पाच ते सहा जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.

याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. यात दिलीप रामचंद्र मेटकरी ( वय 64), दत्तात्रय श्रीमंत आवळेकर (वय 42) , दत्तात्रय अंकुश माने (वय 34), सीताराम मोहन फटे (वय 54), सर्वजण रा. कचरेवाडी यांचा समावेश आहे. पळून गेलेल्यामध्ये उमेश उत्तम गवळी रा.भालेवाडी, बबलू सीताराम शिंदे, लाला काळुंगे, महिपती अंकुश माने, पिंटू माने सर्व जण रा. कचरेवाडी यांचा समावेश आहे.

या छाप्यात पोलिसांनी जुगाराचे पत्ते व रोख रक्कम 15 हजार 550 रुपये, चार दुचाकी व तीन मोबाईलसह 2 लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT