काँग्रेसला मोठा धक्का! माजी केंद्रीय मंत्र्यांचा पक्षाला रामराम

काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, माजी केंद्रीय मंत्र्यांनी पक्षाला रामराम केला आहे
Ashwani Kumar with Manmohan Singh
Ashwani Kumar with Manmohan Singh Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections) तोंडावर काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कायदा मंत्री डॉ.अश्वनी कुमार (Ashwani Kumar) यांनी पक्षाला रामराम केला आहे. मागील महिन्यातच माजी केंद्रीय मंत्री आर.पी.एन.सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. आता कुमार यांच्या रुपाने महिनाभरातच पक्षाला मोठा झटका बसला आहे.

अश्वनी कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मी अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेत आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून आणि माझा सन्मान कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेत आहे. पक्षाच्या बाहेर राहून व्यापक देशहिताचे काम करण्याचा माझा मानस आहे.

Ashwani Kumar with Manmohan Singh
खनिज तेल @100 डॉलर! पेट्रोल, डिझेल दरवाढीचा लवकरच उडणार भडका

दरम्यान, मागील महिन्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री आर. पी. एन. सिंह (R. P. N. Singh) हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये (BJP) दाखल झाले आहेत. सिंह यांच्या रुपाने काँग्रेसच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक मोहरा गळाला आहे. यावरून आता काँग्रेसने सिंह यांच्यावर हल्लाबोल केला असून, त्यांना पळपुटे ठरवले आहे. काँग्रेस नुकतीच तीस जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. त्यात सिंह यांचाही समावेश करण्यात आला होता. पण लगेचच त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने मोठा धक्का बसला होता. भाजपने स्टार प्रचारकालाच गळाला लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते.

Ashwani Kumar with Manmohan Singh
मोठी घडामोड : संतोष परब हल्ला प्रकरणात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांना अटक

सिंह हे काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री होते. सिंह यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. सिंह हे कुशीनगर जिल्ह्यातील आहे. ते 2009 च्या लोकसभा निवडणुकीत कुशीनगर मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर त्यानंतर त्यांना लगेच काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी-2 मध्ये केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाले होते. नंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. पडरौना विधानसभा मतदारसंघाचे 1996, 2002 आणि 2007 मध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com