Ratnagiri News : कोकणात सध्या शिमगोत्सव सुरू असून राजकीय संघर्षासह आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे येथील राजकीय वातावरण तापले आहे. अशातच शहरातील शिवसेना व मनसे आमने-सामने आल्याने राजकीय रंग चढला आहे. यादरम्यान शिमगोत्सवानिमित सहाणेवर शिवसेना व मनसे यांच्यात रंगलेल्या राजकीय जुगलबंदीची जिल्ह्यात एकच चर्चा होत असून एकमेकांचे काढलेले राजकीय वाभाडे चर्चेचा विषय ठरले आहेत.
रत्नागिरीत सध्या राजकीय हालचालींना वेग आला असतानाच प्रत्येक निवडणुकीत एकमेकांवरील कुरघोडी करणाऱ्या शिंदे यांची शिवसेना आणि मनसेचा आमना-सामना झाला आहे. शिमगोत्सवानिमित सहाणेवर शिवसेना व मनसे यांच्यात राजकीय जुगलबंदीत पाहायला मिळाली. तर या जुगलबंदीत मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर व शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय मोदी यांनी एकमेकांचे राजकीय वाभाडे काढले.
रत्नागिरीत तालुक्यात सध्याच्या स्थितीला शिवसेना व मनसे यांच्यातील राजकीय वैर टोकाचे झाले आहे. अशातच राजकीय संघर्षामुळे तालुक्याच अनेकदा चर्चांना रंगही चढतोय. शिमगोत्सवात माजी आमदार संजय कदम यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यावरून पडसाद उमटले. त्यांच्या या राजकीय प्रवेशामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
शिमगोत्सवानिमित्त सहाणेवर शिवसेनेने मनसेच्या वैभव खेडेकर यांना ‘भाऊ’ आले आता तुम्हीही या अशी साद घातली. पण या हाकेला वैभव खेडेकर यांनी नकार दर्शविताना कोटीची कोटी केली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा राजकीय तर्कवितर्कांना उधान आले आहे. तर याचमुद्द्यावरून माजी नगरसेवक मिनार चिखले यांनी, तुम्ही येऊ नका, फक्त मैत्री करा असा सल्ला दिला.
दरम्यान शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय मोदी यांनी वैभव खेडेकर आमच्याकडे आल्यास शिंदे गटातून नगराध्यक्ष होतील, असा दावा करताना खुली ऑफर दिली आहे. पण या ऑफरचा नंतर विचार करू असे वैभव खेडेकर यांनी म्हटले आहे. तर खेडेकर यांनी 2029 नंतर धनुष्यबाणच जाईल आणि शिवसेनेच्या हाती 'कमळ' फुलेल अशी कोपरखळी मारली. या एकमेकांवर केलेल्या राजकीय कुरघोडींची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.