Rohit Patil -Prabhakar Patil
Rohit Patil -Prabhakar Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Tasgaon News : राष्ट्रवादीच्या ‘लेटरबॉम्ब’मुळे खासदार संजय पाटील गट पुरता घायाळ : तासगावात विकासनिधीवरून रंगले राजकारण

रवींद्र माने

तासगाव (जि. सांगली) : तासगाव तालुक्यात चार वर्षे शांत असलेले राजकारण आगामी विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत ढवळून निघाले आहे. पंचायत समिती इमारतीच्या निधीवरून सुरू असलेल्या श्रेयवादाच्या लढाईत राष्ट्रवादीने टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’मुळे भाजप विशेषतः खासदार संजय पाटील यांचा गट चांगलाच घायाळ झाला आहे. (Political dispute between BJP and NCP over development fund in Tasgaon)

तासगाव तालुक्यातील पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या आबा-काका गटातील राजकारण अचानक उफाळून आले आहे. विकास कामांवरून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी १५ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्याला नव्या सरकारने स्थगिती दिली होती. ती स्थगिती उठविण्यात आल्यानंतर या कामाचा मार्ग मोकळा झाला आणि सुरू झाले ते श्रेयवादाचे राजकारण!

तासगाव तालुक्यातील पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या आबा-काका गटातील राजकारण अचानक उफाळून आले आहे. विकास कामांवरून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी १५ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्याला नव्या सरकारने स्थगिती दिली होती. ती स्थगिती उठविण्यात आल्यानंतर या कामाचा मार्ग मोकळा झाला आणि सुरू झाले ते श्रेयवादाचे राजकारण!

प्रभाकर पाटील यांनी थेट आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांच्यावर कठोर शब्दांत टीका केल्याने त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर येणे अपेक्षित होते, आणि तसेच झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला या निमित्ताने आयते कोलीत मिळाले.

जसे भाजपने ‘हे काम आम्ही केले,’ याचे पुरावे देऊन सांगितले. तसेच राष्ट्रवादीनेही आरोप खोडून काढत ते पुरावे खोटे कसे आहेत, हे नवे पुरावे देऊन सांगितले. शिवाय जाता-जाता खुद्द खासदारांचे गिरीश महाजन यांना स्थगिती उठवावी; म्हणून दिलेले पत्र कसे चुकीचे आहे, हे दाखवून दिले. या ‘लेटर बॉम्ब’मुळे भाजप बॅकफूटवर गेला आहे. त्यामुळे भाजपने श्रेयवादाचा दावा करताना पुरेसा गृहपाठ केला नव्हता, हे स्पष्ट झाले.

राष्ट्रवादी सात-आठ वर्षांत प्रथमच आक्रमक

आर. आर. पाटील यांच्यानंतर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण नेमस्तवादी पद्धतीचे राहिले आहे. मात्र, पंचायत समिती इमारत प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली आक्रमक भूमिका गेल्या सात-आठ वर्षांत प्रथमच पाहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT