Nagar News : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश चिटणीस अरुण मुंडे व त्यांचे बंधू उदय मुंडे यांच्या विरोधात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी आणलेला वाळूसाठा चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा राजकीय आकसातून करण्यात आल्याचा आरोप अरुण मुंडे यांनी केला आहे. षडयंत्र करून दाखल करण्यात आलेला हा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी शेवगाव पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता.
भाजपचे प्रदेश सचिव अरुण मुंडे यांच्यासह त्यांच्या भावावर 24 डिसेंबरला शेवगाव पोलिस ठाण्यात वाळूचोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंगेवाडीच्या महिला सरपंचाची याबाबत तक्रार होती. त्यानुसार मंडल अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.
त्यानंतर 30 नोव्हेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून वाळूचोरी झाली नसल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे पोलिसांनी दबाव आणून गुन्हा दाखल करण्यास भाग केल्याचा दावा अरुण मुंडे यांनी केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकूणच शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात आता भाजप पक्षांतर्गत वाद अजूनच विकोपाला जात असल्याचे चित्र असून, या हालचालींमागे कोण यावर ही दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.