Harshvardhan Patil : "बारामतीसाठी अद्याप सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चाच नाही"

Baramati Lok sabha : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या सुनेत्रा पवार यांच्या नावाबाबत खुलासा
Harshvardhan Patil
Harshvardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार गट उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती मतदारसंघातून अजित पवार गटांकडून सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे येत आहे. याबाबत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना विचारलं असता त्यांनी "अद्याप तरी बारामती मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावांची चर्चा नसल्याचे सांगितले आहे".

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कर्जत येथे झालेल्या शिबिरात लोकसभेच्या चार जागा लढणार असल्याची घोषणा करण्यात आली, त्यामध्ये बारामतीचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. त्यामुळे सध्या महायुतीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा अजित पवार गटांकडे जाणारा असून सुनेत्रा पवार या उमेदवार असतील अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Harshvardhan Patil
Raju Shetti : लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका .. राजू शेट्टी यांच्यासह 150 जणांवर गुन्हा

त्यामुळे भाजप आणि शिवसेनेकडून बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. भाजपकडून हर्षवर्धन पाटील देखील बारामती लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, अजित पवार यांनी कर्जत येथील शिबिरामधून बारामती मतदारसंघातील जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. कदाचित भविष्यामध्ये महायुती म्हणून बारामती मतदारसंघ अजित पवार गटाला सोडण्याचा निर्णय देखील घेण्यात येईल. तसा निर्णय झाल्यास युतीचा घटक पक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांचे काम करणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र अद्याप त्या प्रकारचा कोणताही निर्णय झाला नाही. तो निर्णय भाजपच्या वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Harshvardhan Patil
Sangram Jagtap vs Sujay Vikhe : "सेमीफायनल"च्या निकालाने सुजय-संग्राम यांचे चेहरे खुलले... ये रिश्ता क्या कहलाता है

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com