<div class="paragraphs"><p>Ashutosh Kale,&nbsp;Snehlata Kolhe, vijay vahadne</p></div>

Ashutosh Kale, Snehlata Kolhe, vijay vahadne

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

Kale-Kolhe: राजकीय विरोधक काळे-कोल्हे दिसले एकाच व्यासपीठावर

मनोज जोशी

कोपरगाव ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. येथे काळे व कोल्हे परिवाराचा वर्चस्व वाद आहे. हा वाद बाजूला सारत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार आशुतोष काळे ( Ashutosh Kale )भाजपच्या ( BJP ) माजी आमदार स्नेहलता कोल्हे ( Snehlata Kolhe ) काल ( शनिवारी ) एकाच व्यासपीठावर दिसून आले. मागील महिन्यात कोपरगाव शहरातील पाणी प्रश्नावर काळे व कोल्हे समर्थकांत शाब्दिक वाद झाले होते.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कोपरगाव नगरपालिकेच्या इमारतीला निधी मंजूर करून कामास सुरवात केली होती. तळमजल्याचे लोकार्पण आज आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विजय वहाडणे होते. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोपरगाव पालिकेच्या इतिहासात प्रथमच आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व नगराध्यक्ष विजय वहाडणे एकाच व्यासपीठावर आले. शहराच्या पाणीप्रश्नात आमदारांनी लक्ष घालून शहरवासीयांची तहान भागवावी, असे कोल्हे म्हणाल्या. आमदार काळेंनी ही बाब सकारात्मक घेतली. निळवंडे व 120 कोटींच्या पाणीयोजनेसाठी आजी-माजी आमदारांची वेळ घेऊन कार्यकर्तेविरहित बैठकीचे नियोजन करू. त्यातून शहरहितासाठी दोन्ही प्रश्न निश्चित मार्गी लागतील, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केली. या मनोमीलनामुळे सर्वसामान्य कोपरगावकरांनी समाधान व्यक्त केले.

आमदार काळे म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शहरविकासासाठी आजवर 12 कोटी रुपयांचा निधी दिला. यापुढील काळातही शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.

कोल्हे म्हणाल्या, की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका इमारतीसाठी मोठा निधी दिला. त्यातून हे स्वप्न साकार झाले. पुढील कामात आमदारांनी लक्ष घालावे. शहरविकासाचे 30 ते 40 कोटी रुपयांचे प्रस्ताव मार्गी लावले. शहराच्या चांगल्या कामासाठी सर्व जण एकत्र, एकोप्याने राहिले, तर सर्व प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाहीत. शहर पाणीप्रश्नी मी सर्वांसोबत आहे. आमदारांनी आता शहरवासीयांची तहान भागवावी, ही कळकळीची विनंती.

राजकीय सूर जुळले

एकंदरीत, पालिकेच्या गेल्या पाच वर्षांच्या अखेरीस का होईना, कोल्हे- काळे- वहाडणे यांचे राजकीय सूर जुळल्याने शहरवासीयांच्या आशा पाणीप्रश्नी पल्लवित झाल्या आहेत. मात्र, राजकीय हेवेदावे सोडून सर्वांनी एकविचाराने एकत्र येणे आता गरजेचे आहे. नाही तर धरणातील पाण्यावर दुसरेच आपल्यासमोर ताव मारतील, हे निश्चित, असे कोल्हे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT