Kalyanrao Kale-Abhijeet Patil
Kalyanrao Kale-Abhijeet Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अभिजित पाटलांचा कल्याणराव काळेंना दणका; ‘चंद्रभागा’चे आजी-माजी संचालक लागले गळाला!

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर काखान्याचे (Vitthal Sugar Factory) अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांनी चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांना ऐन दिवाळीत झटका दिला आहे. विठ्ठल कारखान्याने गाळप केलेल्या पहिल्या ११ साखर पोत्यांचे पूजन चक्क चंद्रभागा कारखान्याच्या आजी-माजी संचालकांच्या हस्ते करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत चंद्रभागाची निवडणूक लागणार आहे, त्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी चंद्रभागाच्या आजी-माजी संचालकांना गळाला लावून कारखान्यात लक्ष घातले की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Poojan of sugar sacks of Vitthal factory in Pandharpur)

गेली दोन वर्षांपासून बंद असलेला पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना अभिजित पाटील यांनी निवडणूक जिंकल्यानंतर सुरू केला आहे. या कारखान्यातून उत्पादीत झालेल्या पहिल्या ११ साखर पोत्यांचे पूजन चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर कदम, बिभिषण पवार, कालिदास पाटील, ज्ञानोबा कराळे, मधुकर नाईकनवरे, हनुमंत सुरवसे, बाळासाहेब कौलगे, माजी संचालक इस्माईल मुलाणी, कालिदास पाटील, ज्ञानोबा कराळे यांच्यासह विठ्ठलचे अध्यक्ष अभिजीत पाटील, बब्रुवान रोंगे व उपाध्यक्ष प्रेमलता रोंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

विठ्ठल कारखान्याच्या साखर पोते पूजनाला चंद्रभागा साखर कारखान्याचे विद्यमान सात, तर तीन माजी संचालक उपस्थित होते. हे सर्व कल्याणराव काळे यांचे खंदे समर्थक मानले जात होते. मात्र, हे सर्व संचालक अभिजित पाटील यांच्या गळाला लागले की काय अशी सध्याची परिस्थिती आहे. विशेष म्हणजे याच नेत्यांनी विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे चंद्रभागा साखर कारखान्याची निवडणूक लढण्याचे अभिजित पाटील यांनी मनावर घेतल्याचे दिसून येते.

अभिजित पाटील यांनी दोन वर्षांपासून बंद असलेला विठ्ठल कारखान्याचे यशस्वी गाळप सुरू केले आहे. या कारखान्यात उत्पादीत झालेल्या साखर पोत्यांचे पूजन चंद्रभागाच्या आजी-माजी संचालकांच्या हस्ते करून आता चंद्रभागे निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत चंद्रभागेच्या निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. त्यात अभिजीत पाटील हे काय भूमिका बजावणार, याकडे पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT