तांदूळवाडीवरून दररोज मेसेज येतो ‘कुछ तो होनेवाला है’ : खडसेंचा रावेरमध्ये गौप्यस्फोट

आपल्याला कितीही त्रास दिला तर आपण सर्वांना पुरुन उरेन.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

रावेर (जि. जळगाव) : आमचे विरोधक रोज म्हणतात, ‘कुछ तो होनेवाला है. लेकीन कुछ होनेवाली नहीं हैं. मैं तुम्हारे उरापर आकर बैठूंगा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपल्यावर होणाऱ्या कारवाईसंदर्भाने विरोधकांना आव्हान दिले. (Every day message comes from Tandulwadi 'Kuch to honewala hai': Khadse)

रावेर तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेत एकनाथ खडसे बोलत होते. भोसरी जमीन गैरव्यहार प्रकरणी नव्याने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, जळगाव जिल्हा दूध सहकारी संघ बरखास्त करण्यात आला आहे. त्यामुळे खडसे सध्या सर्व बाजूंनी अडचणीत आले आहेत की काय, अशी चर्चा रंगली आहे.

Eknath Khadse
गणपतराव देशमुखांच्या नातवांनी बिनविरोधची परंपरा जपली; सांगोला सूतगिरणीसाठी आजी-माजी आमदारांचीही साथ

तांदूळवाडीवरून ‘व्हॉटस ॲप’ला मेसेज टाकतात, ‘कुछ तो होनेवाला है.’ लेकीन ‘कुछ होनेवाली नही है. हम तुम्हारे उरापर आनेवाला है.’ आपल्याला कितीही त्रास दिला तर आपण सर्वांना पुरुन उरेन. नाथाभाऊंना काहीही होणार नाही. कारण, ही जनता माझ्याबरोबर आहे, असा इशाराही खडसे यांनी विरोधकांना दिला.

Eknath Khadse
‘राष्ट्रवादी पुन्हा...’ हे गाणे वाजवून केले चंद्रकांत पाटील यांचे स्वागत!

खडसे म्हणाले की, कामाच्या आणि संपर्काच्या बळावर तुम्ही जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिली. सर्वसामान्य माणसाने नाथाभाऊंवर खूप प्रेम केले. तुम्ही मला ४० वर्षे साथ दिली आहे. अशीच साथ यापुढेही अपेक्षित आहे. आम्ही काम करायला अजूनही तयार आहोत. नाथाभाऊ कामाच्या बाबत मागे राहणार नाही.

आमच्या विरोधकांना माहिती आहे की नाथाभाऊ एकमेव अडसर आहे, त्यामुळे नाथाभाऊला ऐनकेन प्रकारे अडकविण्याचा प्रयत्न चालला आहे. कसंही करून नाथाभाऊला तुरुंगात टाका. खोटे नाटे, काय असतील नसतील ते प्रयोग करून पाहिलं. काही तरी खोटेनाटे आरोप करायचे, मला अडकावचं. जेलमध्ये टाकायचं आणि त्यांच्या निवडणुका सोप्या करायच्या, हे षडयंत्र आमच्या विरोधकांकडून करण्यात येत आहे. पण, जनतेच्या साथीमुळे हे प्रयत्न हाणून पाडत आहे, असा विश्वासही खडसे यांनी या वेळी बोलून दाखवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com