Pune station Sharad Pawar And BJP MP Medha Kulkarni sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP Vs NCP SP : पुण्यात राष्ट्रवादीविरोधात पोस्टरबाजी! पुणे स्टेशन नामकरणावरून भाजपला परशुराम संघाची साथ

Parashuram Hindu Seva Sangh Supports Medha Kulkarni : पुणे रेल्वे स्थानकाचे नामांतरावरून आतास राजकारण चागलेच तापत चालले आहे. भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या बाजूने परशुराम हिंदू सेवा संघ उतरला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे रेल्वे स्थानकाचे नामांतर करावे अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावं, अशा मागणीचा प्रस्ताव भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिला आहे. त्यांच्या या मागणीनंतर आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. या नावाला विरोध दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इतर पाच नावे रेल्वे स्थानकाला देण्याबाबत सुचवण्यात आला आहे. यानंतर आता शरद पवारांच्या पक्षाचा पेशव्यांच्या नावाला विरोध का? अशा आशयाचे पोस्टर पुणे शहरात लागल्याचे पाहायला मिळत आहे.

खासदार मेधा कुलकर्णी यांनी थोरले बाजीराव पेशवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या स्वराज्याचा भव्य विस्तार केला. त्यांनी हिंदवी स्वराज्याचा कटक ते अटक असा व्यापक फैलाव केला. शनिवारवाडा हे त्यांच्या पराक्रमाचे आणि स्वराज्याच्या वैभवाचे प्रतीक आहे. पुणे हे त्या काळात स्वराज्याचे प्रमुख केंद्र होते. त्यामुळे पुणे रेल्वेस्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी केली.

त्यांच्या या मागणीनंतर विविध प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. मेधा कुलकर्णी यांच्या मागणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या मागणीवर आपला आक्षेप नोंदवला. ज्या महापुरुषांनी पुण्यासाठी खूप काही योगदान दिलं आहे. ज्यांनी समतेचा विचार दिला आहे. अशा वेगवेगळ्या नेत्यांची नावे पुणे रेल्वे स्थानकासाठी सुचवणं अपेक्षित होतं. मात्र तसं न करता पुन्हा एकदा पुण्यात पेशवाईचा संदेश देणे हे कितपत संयुक्तिक आहे याचा विचार मेधा कुलकर्णी यांनी करणं अपेक्षित असल्याचे म्हणत टीका केली होती.

आता या मागणीमुळे भाजपचा ओठात काय आहे आणि पोटात काय आहे? हे जगासमोर आलं आहे. महात्मा ज्योतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, धर्मवीर संभाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारखी खूप सारी नाव असताना देखील मेधा कुलकर्णी यांनी थोरले पेशव्यांच्या नावावर आग्रही आहेत. यातूनच भाजपला पुण्यात पुन्हा पेशवाई आणायची आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे अशी टीका जगताप यांनी केली होती.

त्यानंतर पुणे शहरातील विविध चौकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाविरोधात परशुराम हिंदू सेवा संघाने पोस्टर बाजी केल्याचा पाहायला मिळत आहे. या पोस्टरमधून रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशवा यांचं नाव देण्यास शरद पवार गटाचा विरोध का ? असा सवाल विचारण्यात आला आहे.

तसेच ठळक शब्दात या प्रश्नाचे उत्तर द्या अशी मागणी देखील शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात आली आहे. तसेच अजिंक्य योद्धा श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा? अपमान पुणेकर सहन करणार नाहीत, असा इशारा देखील या पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT