Mahalung-Sreepur Posters sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

हॅलो मी ‘डी’ बोलतोय...भाजप विरोधात मतदान करायचे आहे, हे लक्षात ठेवा!

भाजपला मतदान न करण्याचे आवाहन करणारे महाळूंग-श्रीपूर परिसरात लागले पोस्टर्स

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील महाळूंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत (nagar panchyat election) भाजपला (bjp) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. हा पराभव भाजप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यातच मी ‘डी’ बोलतोय, भाजपला मतदान करायचे नाही, हे लक्षात ठेवा, अशी पोस्टर्स महाळूंग-श्रीपूरमध्ये ठिकठिकाणी झळकली आहेत. त्यामुळे भाजपच्या विरोधात मतदान करायला सांगणारा हा ‘डी’ कोण? याचीच चर्चा या परिसरात रंगली आहे. (Posters appearing in Mahalung-Sreepur area urging BJP not to vote)

महाळूंग-श्रीपूर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला (ncp) सहा जागा मिळाल्या आहेत. पक्षाने एकदिलाने निवडणूक लढवल्याने सर्वाधिक जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. त्या तुलनेत भाजपला गटबाजीने घेरले होते. नानासाहेब मुंडफने व भिमराव रेडे पाटील यांच्या गटाने प्रचारात मोहिते पाटलांच्या फोटोचा व नावाचा वापर केला होता. त्याचा फायदा या दोन गटांना झाला आहे. त्या तुलनेत भाजपच्या उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोंचा वापर आपल्या प्रचारात केला होता. अगदी शेवटच्या क्षणी भाजपने चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता.

भाजपने अगदी शेवटच्या क्षणी चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि अनिल जाधव यांच्यावर निवडणुकीची सर्व जबाबदारी सोपविली होती. या परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, मोहिते पाटील समर्थक दोन गट व राजकीय व्यूहरचनेत भाजपला मारक ठरतील, असे अनेक अपक्ष उमेदवार यांच्याशी लढताना भाजपची कमालीची दमछाक झाली. त्या साऱ्याचा परिणाम म्हणून भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या पराभवानंतर आपल्या पराभवाला कोण जबाबदार आहे? याचे आडाखे भाजपचे कार्यकर्ते बांधत आहेत.

महाळूंग-श्रीपूरसह विविध ठिकाणी मी 'डी' बोलतोय. भाजपच्या विरोधात मतदान करायचे आहे, लक्षात ठेवा, असा मजकूर असलेली पोस्टर झळकली आहेत. ही पोस्टर कोणी लावली आहेत. हा 'डी' कोण याची चर्चा रंगली आहे. भाजपच्या पराभवाचे खापर कोणीतरी या 'डी'च्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे. या 'डी'चे महाळूंग श्रीपूर परिसरातील काही मंडळींना फोन आले होते. काही लोकांनी असे कॉल रेकॉर्ड केल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या 'डी'च्या नावाची आज सर्वत्र चर्चा होत आहे.

हा डी कोण?

या ‘डी’च्या सांगण्यावरून काही लोकांनी भाजपला मते दिली नसली तर, या ‘डी’चे अस्तित्वही मान्य कारावे लागेल. भाजप या ‘डी’चा शोध घेणार का हा खरा प्रश्‍न आहे. हा ‘डी’ पक्षाशी संबंधित आहे की, पक्षाच्या बाहेरील आहे. तो पक्षाशी संबंधित असेल तर, पक्ष त्याच्यावर कारवाई करणार का? किंवा पक्षातील वरिष्ठांच्या संमतीनेत हे सर्व घडले आहे. याचा खुलासा आता भाजपने करायला हवा. त्याशिवाय ही संभ्रम संपणार नाही, हे विशेष.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT