Chandrakant Patil-Ajit Ghorpade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Politic's : राष्ट्रवादी नेत्याच्या गुगलीने भाजपचं टेन्शन वाढवलं; ‘निवडणूक काळात साथ दिलेल्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी’

Sangli Zilla Parishad President : सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अनिश्चितता कायम आहे. राष्ट्रवादी व भाजपमध्ये तीव्र चुरस असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे सत्ता स्थापनेची किल्ली असल्याने जिल्ह्यात राजकीय तणाव वाढला आहे.

Vijaykumar Dudhale

Sangli, 21 February : सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत १२ दिवसांनंतरही अनिश्चितता कायम आहे. सर्वाधिक १८ जागा जिंकलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि त्याखालोखाल १६ जागा जिंकलेल्या भाजपमध्ये सत्ता स्थापनेसाठी मोठ्या प्रमाणात चुरस दिसून येत आहे. मात्र, सत्तेची चावी ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या हाती आहे, त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीला कमालीचे महत्व सांगलीत आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे माजी आमदार अजितराव घोरपडे यांनी भूमिका मांडली असून त्यांच्या भूमिकेमुळे भाजपचं टेन्शन वाढविले आहे, हे मात्र नक्की.

सांगली (Sangli) जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने १८ , काँग्रेस पक्षाने ११, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एक जागा जिंकली आहे, त्या सर्वांची बेरीज तीस होते. दुसरीकडे, महायुतीमधील भाजपने १६, शिवसेनेने ०७, राष्ट्रवादी काँग्रेसने ०६, तर जनसुराज्य आणि रयत क्रांती संघटनेने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.

महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सोबत धरून भाजपने सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्ष बसविण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, हे दोन्ही पक्षांना डावलून भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूकपूर्व आघाडी केली होती, तर शिवसेना ही स्वबळावर लढली होती, त्यामुळे हे दोन्ही पक्षाच्या हाती भाजपचे भवितव्य आहे. राष्ट्रवादीने सोबत यावे, यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना व्हीप आणि नियम पाळावेच लागतील, असे सांगून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याचा जयंत पाटील यांनी समाचार घेतला आहे. भाजप राष्ट्रवादीवर दादागिरी करत असून राष्ट्रवादीने भाजपसोबत जाऊ नये, असे म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी आमदार अजितराव घोरपडे यांनी टाकलेल्या गुगलीमुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे. ते म्हणाले, निवडणूक लढवताना काही चर्चा झाली होती आणि त्यातून काही गठबंधन झालं होतं. त्या गठबंधनावेळी जी लोकं चर्चेला होते. जो पक्ष किंवा संघटना त्या चर्चेत सोबत होती. त्यांना सोबत घेऊनच पुढचा प्रयोग करावा.

निवडणूक काळात ज्या पक्षासोबत गठबंधन झाले होते, त्या पक्षाने निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे त्यांना सोडून काही करता येणार नाही आणि ते बरोबर दिसणारही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सहकार्याने आमचे राजकारण पुढे चालू आहे. त्यामुळे कदाचित राष्ट्रवादी व्हीप देईल, तो आम्हाला मान्य असेल. त्यांना तो देण्याचा अधिकार आहे, असे अजित घोरपडे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT