

ZP Election News: राज्यातील 12 जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकाल हाती येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट 85 जागावर आघाडी आहे. 10 जागांवर विजय मिळवला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागा, काँग्रेस 12 जागा, भाजप 7 जागा, शिवसेना 6 जागांवर विजय मिळवला आहे.
आत्तापर्यंत 731 जिल्हा परिषद सदस्यांपैकी 382 जागांचा कल हाती आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट-85, भाजप- 133, शिवसेना शिंदे गट- 88, काँग्रेस- 28, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष - 20, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - 7, इतर- 21 जागांवर आघाडीवर आहेत.
अजितदादांच्या निधनामुळे निर्णय विजयाच्या जल्लोष करणार नसल्याचा निर्णय मुंबईत BJP प्रदेश मुख्य कार्यालयाने घेतला आहे.
काँग्रेस- 30
शिवसेना ठाकरे गट- 20
राष्ट्रवादी शरद पवार गट- 8
भाजप- 133
शिवसेना शिंदे गट- 88
राष्ट्रवादी अजित पवार गट- 85
इतर- 21
कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यांना धक्का बसला आहे. उचगाव मतदार संघात एक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा भाजप उमेदवार विजयी झाला आहे. जिल्हा परिषद भाजप उमेदवार नामदेव वाईंगडे आणि पंचायत समितीसाठी तानाजी कांबळे विजयी झाले आहेत. काँग्रेसला या मतदार संघात फक्त एका पंचायत समितीवर विजय मिळाला आहे. सुनीता यादव विजयी झाल्या आहेत.
कोल्हापूर : गोकुळचे माजी अध्यक्षची कन्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता डोंगळे कौलव मतदार संघातून विजयी झाल्या आहेत.
सावंतवाडी तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक संदीप गावडे विजयी झाले आहे. ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा पराभव झाला आहे. तळवडे पंचायत समिती गणातून शिंदेसेनेच्या सुस्मिता जाधव या विजयी झाल्या आहेत. तर मळगाव गणातून भाजपाचे गौरव मुळीक विजयी झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.