Shivsena Activist In Patan
Shivsena Activist In Patan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

APMC Result : पाटणला 40 वर्षानंतर सत्तांतर; शंभूराज देसाईंना कामाख्या देवी पावली...

Umesh Bambare-Patil

-जालिंदर सत्रे

Patan APMC Election Result : पाटण शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांच्या पॅनेलने १५ जागा जिंकत राष्ट्रवादीच्या ताब्यातून सत्ता हिसकावून घेत तब्बल ४0 वर्षानंतर सत्तांतर घडवले. सत्यजितसिंह पाटणकर Satyajit Patankar यांच्या पॅनेलला तीन जागा मिळाल्या. पाटण बाजार समितीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले हाोते. अखेर शंभूराज देसाईंना कामाख्या देवी पावल्याची चर्चा पाटण मतदारसंघात सुरू झाली आहे.

पाटण बाजार समितीच्या निवडणुकीत पारंपरिक शंभूराज देसाई व विक्रमसिंह पाटणकर गटात अटीतटीची लढत झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली हाोती. सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. व्यापारी व ग्रामपंचायत मतदारसंघाचे निकाल लवकर मिळाले.

सोसायटी मतदार संघाच्या मतमोजणीस उशीर झाल्याने व मतदान केंद्रावर मेळ बसत नव्हता. ग्रामपंचायत मतदारसंघ : मंत्री देसाई यांच्या पॅनेलचे विजयी उमेदवार- सर्वसाधारणमधून जोतीराम काळे, समीर भोसले, अनुसूचित जाती मतदारसंघातून सिद्धार्थ गायकवाड आर्थिकदृष्ठ्या दुर्बल घटक प्रतिनिधी सुधाकर देसाई.

सोसायटी मतदारसंघात सर्वसाधारणमधून संग्राम मोकाशी, मानसिंग कदम, विलास गोडांबे, राजेंद्र पाटील, सिताराम सूर्यवंशी, बाळकृष्ण पाटील, दादासो जाधव, महिला प्रतिनिधी वैशाली शिंदे, जयश्री पवार, इतर मागासप्रवर्ग नितीन यादव, भटक्या, विमुक्त जाती प्रवर्ग धनाजी गुजर.

राष्ट्रवादी काँग्रेसचे हमाल मापाडी मतदार संघातून आनंदराव पवार हे बिनविरोध निवडून आले असून मतमोजणीत व्यापारी मतदार संघातून बाळासाहेब महाजन व अरविंद पाटील विजयी झाले आहेत. संपूर्ण पाटण तालुकाभर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत विजय साजरा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT