MLA Prakash Abitkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLA Prakash Abitkar : आमदार आबिटकरांनी करून दाखवलं; मतदारसंघातील ग्रामपंचायतींचं रुपडं पालटणार

Rahul Gadkar

Kolhapur Political News :

राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा दुर्गम समजला जातो. मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायतींच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यांची दुरुस्ती व्हावी किंवा नवीन बांधकाम करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. ज्या वास्तूंमधून गावांचा कारभार केला जातो, विकास केला जातो त्या वास्तू मोडकळीस आल्यामुळे नकारात्मक चित्र दिसतं. ही बाब लक्षात घेऊन आमदार प्रकाश आबिटकर यांनी विशेष प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि राधानगरी-गारगोटी मतदारसंघातील 37 ग्रामपंचायतींना नवीन इमारत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राधानगरी तालुक्यातील 11, भुदरगडमधील 17 व आजरा तालुक्यातील 9 अशा एकूण 37 ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाचा प्रश्न मार्गी लागला आहे. राज्य सरकारच्या 'बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने'अंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:ची स्वतंत्र इमारत नाहीत, अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालय इमारत बांधण्यासाठी राज्य सरकारने हा निधी मंजूर केला आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघातील (Radhanagari Assembly Constituency) 37 ग्रामपंचायतींच्या नवीन इमारत बांधकामासाठी सुमारे 7 कोटी 65 लाख रुपयांचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला आहे.

नवीन इमारतीची आवश्यकता असणाऱ्या ग्रामपंचायतींना तत्काळ निधी (Fund for grampanchayat Building construction) द्यावा, अशी लेखी मागणी सरकारकडे केली. त्यानुसार ग्रामविकास विभागाने 26 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार 37 ग्रामपंचायतींना कामांना मंजुरी दिली आहे. याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती शिवसेना (शिंदे) आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोणत्या ग्रामपंचायतींना किती निधी?

भुदरगड तालुका

पारदेवाडी (20 लाख), दोनवडे (20 लाख), टिक्केवाडी (25 लाख), मिणचे बुद्रूक (20 लाख), दारवाड (20 लाख), करडवाडी (20 लाख), निष्णाप (20 लाख रुपये), अंबवणे (20 लाख), पळशिवणे (20 लाख), बेगवडे (20 लाख), नांगणवाडी (20 लाख), देवूळवाडी (20 लाख), कोणवडे (25 लाख), नवरसवाडी (20 लाख), कलनाकवाडी (20 लाख), पाळ्याचाहुड्डा (20 लाख) आणि शिवडाव (20 लाख).

राधानगरी तालुका

सावार्डे-पाटण (25 लाख), फेजिवडे (25 लाख), तळगाव (25 लाख), खिंडी-व्हरवडे (20 लाख), कपिलेश्र्वर (25 लाख), कासारवाडा (20 लाख), ऐनी (25 लाख), फराळे (25 लाख), पिरळ (25 लाख), कुडित्री (20 लाख) आणि धामोड (25 लाख).

आजरा तालुका

हाजगोळी ब्रुद्रक (20 लाख), खेडे (20 लाख), चांदेवाडी (20 लाख), कोरीवडे (20 लाख), साळगाव (20 लाख), हाळोली (20 लाख), पेरणोली (25 लाख), वेलवट्टी (20 लाख) आणि गवसे (20 लाख).

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT