Kolhapur News : गेल्या महिनाभरापासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार यावरुन मोठा खल सुरू आहे. त्यातच महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज यांचे नावाची चर्चा जोर धरु लागली आहे. यातच शाहू महाराजांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या उमेदवारीचे मोठे संकेत दिले आहे.
श्रीमंत शाहू महाराजांनी (Shrimant Shahu Maharaj) आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जागेसंदर्भात तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार आहे. पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर एक जबाबदारीसुद्धा असेल. यामुळे आता शाहू महाराजांनी महाविकास आघाडीकडून तेच उमेदवार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. तसेच ब्रेकिंग न्यूज सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल आणि यासाठी मला तुमचं मार्गदर्शन लागणार आहे असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
शाहू महाराज म्हणाले, कोल्हापूरच्या चांगल्यासाठी आणि विकासासाठी जे काही आवश्यक असेल, त्यासाठी मी नेहमी तुमच्यासोबत संवाद साधेन. आपण सर्वांनी मिळून काम केलं तर अनेक गोष्टी लवकर होतील. तसेच कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारीचा मुद्दा दिल्लीपर्यंत गेला आहे असं मला कळतंय. दिल्लीमध्ये काय होईल हे मला माहित नाही. मी या दृष्टीने कधीच दिल्लीला गेलो नाही आणि मुंबईलाही गेलो नाही. मी कोल्हापूरमध्ये शांत बसून आहे. मात्र, सर्वांची अपेक्षा असेल तर तुमच्यासाठी मी नेहमी उपलब्ध आहे असेही शाहू महाराजांनी सांगितले .
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Loksabha Constituency) श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवावी अशी इच्छा महाविकास आघाडीतील सर्व पक्षांची आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने उमेदवार कोण या संदर्भात घोषणा करण्यात आलेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट न्यू पॅलेस येथे जात शाहू महाराजांची भेट घेतली. यामुळे त्यांच्या उमेदवारी संदर्भात चर्चांना उधाण आले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अशातच दोन दिवसांपूर्वी शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यामुळे मला कोणतेही ऑफर नाही,मात्र येण्याची शक्यता आहे. असे म्हणत सूचक इशारा दिला होता. तर आज कोल्हापुरात ब्रेकिंग न्यूज या पुस्तक प्रकाशन सोहळ्या दरम्यान त्यांनी पुन्हा सूचक इशारा देत आपल्याला उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.